म्हासोली, नांदगाव, शामगावतील युवक कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

आजअखेर कृष्णा रुग्णालयातून 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कऱ्हाड तालुक्‍यातील कोरोनामुक्तांची संख्या 115 वर पोचली आहे.

कऱ्हाड ः येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या चार युवकांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मान्यवरांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात या कोरोनामुक्त युवकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. म्हासोली, नांदगाव आणि शामगाव येथील हे कोरोनामुक्त युवक आहेत.
 
म्हासोली येथील 32 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 22 वर्षीय व शामगाव येथील 22 वर्षीय युवक गेल्या काही दिवसांपासून कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डत उपचार सुरू होते. उपचारनंतर त्यांच्या तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विजय गोडसे, फौजदार आर. एल. डांगे, अशोक भापकर यांच्या हस्ते कोरोनामुक्त युवकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

मध्यरात्रीची कृष्णकृत्ये एलसीबीने केली उघड

सातारा जिल्ह्यात रोज वाढतोय आकडा; कोरोनाबाधित ५०० पार 

खंडोबा देवस्थानच्या मानकऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्‍कामोर्तब 

हातगाड्यावरून केला शेकडो किलोमीटर प्रवास!, कोरोनाच्या भीतीने गाठले गाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Four Youth Recovered From Covid 19 In Karad Taluka