कोरोनाच्या धास्तीने आटतोय मायेचा झरा?; तासाभरात होताहेत अंत्यसंस्कार होताहेत अंत्यसंस्कार

Satara
Satara

विंग (जि. सातारा) ः कोरोना विषाणूमुळे गावोगावी अंत्यसंस्कारात बदल होत आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे मायेचा झरा आठतोय, की काय असा प्रश्न निर्माण होत असून, कोणत्याही मृत व्यक्तीवर आता अवघ्या तासाभरातच अंत्यसंस्कार होतानाचे चित्र दिसत आहे. एरवी कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांची वाट पाहण्यात सर्व जण सात- आठ तास थांबत होते. रक्षाविधी दहा वाजण्याच्या आत, तर दशक्रिया व 13 व्याचा विधी आता पाचव्या अथवा सातव्या दिवशी घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. 

अचानक उद्‌भवलेला "कोरोना' जनमाणसाचा दिनक्रमच बदलून टाकत आहे. जीवनशैली त्यामुळे बदलली आहे. धास्तीमुळे मृत व्यक्तीवर अंत्यविधी व अंत्यसंस्कार आता बदलले आहेत. विधीच्या रूढी परंपरा मागे पडत आहेत. मृत व्यक्तीवर त्वरित अंत्यसंस्कार होताना दिसत आहेत. रक्षाविधी, दशक्रिया विधीनंतर 13 व्याच्या विधीतही बदल झाल्याचे चित्र आता गावोगावी निर्माण झाले आहे. एरवी एखादी व्यक्ती मृत झालीच तर भावकी, बाहेरहून येणारे नातेवाईक अन्य लोक गोळा होत होते. नातेवाईक पुण्या- मुंबईचे असतील, तर त्यांना अंत्यदर्शनासाठी येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. जिव्हाळ्याची मायेची नाती म्हणजे मुलगा आला का? भाऊ, बहिण आली का? त्यात सात ते आठ तास सहज जात होते. कुठेपर्यंत आलाय? त्यात पोचेपर्यंत जीव भांड्यात पडायचा. वारंवार फोनवर संपर्क साधून मग तिथून पुढे अंत्यविधी तयारी अन्‌ अंत्यसंस्कार मग त्यातून भावकीची सुटका असे चित्र सहज डोळ्यासमोर येते. काही वेळा नातेवाइकांची वाट पाहण्यात रात्र- रात्रभर मृतदेह ठेवल्याचे चित्र येथे आहे. कोरोनाने मात्र संपूर्ण चित्रच आता बदलून टाकले आहे. गावाकडे एखादी व्यक्ती मृत झालीच तर धास्तीने तासाच्या आतच तिच्यावर अंत्यसंस्कार घडत आहे. भावकीपुढे संबंधित मृत कुटुंबीय होत आहे हतबल. ठिकठिकाणी त्यांच्या भावनेचा प्रश्नही निर्माण होत आहे. ना बोलता येईना ना सांगता येईना, त्यात प्रशासनाकडून कारवाईच्या भीतीची टांगती तलवार कायम आहे. मग जवळचे नातेवाईक असतील तरीही सबुरीचा सल्ला देऊन येऊ नकोस सूचना केली जात आहे. कोरोनाच्या धास्तीने गावोगावी आता चित्र निर्माण झाले आहे. रक्षाविधी दहाच्या आत घडत आहेत. एरवी ते अकरापर्यंत चालत होते. दशक्रिया विधी दहाव्या दिवशी, तर 13 वा 13 व्या दिवशी अशी प्रथा रूढ होती. मात्र, दशक्रिया पाचव्या अन्‌ 13 वा सातव्या दिवशी घेण्याकडे कल आता वाढला आहे. 

काळानुसार हा बदल अपेक्षित 

दरम्यान, काही गावांमध्ये सर्व विधी तिसऱ्या दिवशीही घडत आहेत. वाया जाणारा वेळ त्यामुळे वाचतो आहे. कोरोना विषाणूच्या संकटात, तसेच काळानुसार हा बदल अपेक्षित असल्याचीही नागरिकांत चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com