Satara : ग्रुप कॅप्टन प्रशांत चव्हाण यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

अतुलनीय सेवेबद्दल झाला दिल्लीत सन्मान
Group Captain Prashant Chavan
Group Captain Prashant Chavansakal

सातारा : आझादी का अमृत महोत्सव आणि ७४ व्या प्रजासत्ताक दिनी ग्रुप कॅप्टन प्रशांत सिताराम चव्हाण यांना त्यांच्या अतुलनीय कार्य आणि सेवेबद्दल वायुसेना पदक (VM) देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ग्रुप कॅप्टन प्रशांत चव्हाण हे भारतीय वायुसेनेमध्ये (IAF) हेलिकॉप्टर पायलट ऑफिसर असून सद्या ते हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.

प्रशांत चव्हाण हे सातारा तालुक्यातील ठोसेघर गावचे रहिवाशी आहेत. ते सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) पुणे येथे त्यांचे महाविद्यालयीन लष्करी शिक्षण पुर्ण झाले आहे. त्यानंतर त्यांची हवाई दलासाठी निवड झाली. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली यांची बीएस्सी पदवी मिळवली आहे.

एअर फोर्स अकादमी अलाहाबाद व हैद्राबाद येथील लढाऊ विमान उड्डाणाचा दीड वर्षांचा खडतर अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांचा फायटर पायलट म्हणून कमिशन सोहळा (१९९९) तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांचे हस्ते विंग (पंख) झाला पडला होता. त्यानंतर हकीम पेट येथे फायटर पायलट म्हणून सराव करत असतांना त्यांची निवड हेलीकॉप्टर कनव्हरशन कोर्ससाठी झाली.

बेंगलोर येथील MI-8 हेलीकॉप्टर प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांना बेस्ट पायलट म्हणून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. त्यांनी फ्लाइंग ऑफीसर ते ग्रुप कॅप्टन या पदापर्यंत मजल मारली आहे. आसाम, गुवाहाटी, जम्मु कश्मीर, ध्वाईस, ड्रास, कारगील, ग्वाल्हेर, जोधपूर इ. हवाई तळावर कार्यरत राहून ग्वाल्हेर येथे हेलीकॉप्टर कॉम्बैट लीडर म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले व सर्वोत्कृष्ट HCL म्हणून बक्षिस मिळवले.

संयुक्त राष्ट्र संघ UNO मिशन एक वर्षाचा परदेश दौरा गोमा वकांगो येथे पूर्ण केला. तद्नंतर जोधपूर / ग्वाल्हेर येथून त्यांची डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे युध्दनीती अभ्यासासाठी (पॅज्युएशन कोर्स) निवड झाली. त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. जोधपूर येथे VIP स्कॉड्रन मध्ये त्यांची बदली झाली.

पोखरण येथील हेलीकॉप्टर यूनिट चे कमांडींग ऑफिसर म्हणून त्यांची नेमणुक तसेच वज्रमुठ ( IRON FIST) / वायुशक्ती या हवाईदलाचे युध्दाभ्यास दरम्यान M-17 या हेलिकॉप्टरचे सारथ्य करण्याचा मान मिळाला आणि ग्रुप कॅप्टनपदी बढती मिळाली. कोरोना काळात ते हवाई दलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे तीन वर्ष कार्यरत होते.

ग्रुप कॅप्टन प्रशांत चव्हाण यांचे वडील सिताराम चव्हाण हे भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. धाकटी बहिण विंग कमांडर अर्चना चव्हाण - महाजन ही हवाईदलात राजस्थान येथे सिमावर्ती तळावर कार्यरत आहे. प्रशांत चव्हाण आपल्या यशाचे श्रेय वडिल, बहिण यांना देतात पण विशेष श्रेय आपल्या आईला सुमन चव्हाण यांना देतात. आधी नौदलातील सेवा व नंतर मर्चंट नेव्ही मधील नोकरी त्यामुळे वडील सतत घराबाहेर असायचे.

या काळात दहावी शिकलेल्या आपल्या आईने आम्हां भावंडाना घडविले याचा मला खूप अभिमान आहे. पत्नी सौ. शुभांगी चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आवर्जून सांगतात. ग्रुप कॅप्टन प्रशांत चव्हाण यांचे खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण (आप्पा), सातारा नेव्हल बेटणर्स असोशिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com