साताऱ्यात 1965 जणांना 'कोविड'चे लसीकरण; आरोग्य विभागाची माहिती

प्रशांत घाडगे
Friday, 22 January 2021

देशभरात 16 जानेवारी रोजी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर 24 हजार 789 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती.

सातारा : गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील नऊ केंद्रांमधील आरोग्य विभागातील एक हजार 965 कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आली आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला गंभीर स्वरूपाची रिऍक्‍शन आली नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

देशभरात 16 जानेवारी रोजी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर 24 हजार 789 कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जात आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी 614, 19 जानेवारी रोजी 511, तर 20 जानेवारी रोजी 840 कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील नऊ केंद्रांमध्ये सर्वांत जास्त लसीकरण कऱ्हाड येथील दोन केंद्रांमध्ये अनुक्रमे 278 व 244 नागरिकांचे झालेले आहे. तर साताऱ्यात 216, फलटण 188, पाटण 224, कोरेगाव 194, दहिवडी 169, खंडाळा 221, वाई 231 एवढ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सैन्यदल, हवाई दल, पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात केली जाणार आहे.

Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा  

एक ते दोन दिवसांचे अंतर ठेवून लसीकरण 

जिल्ह्यात नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण सुरू आहे. यामध्ये आठवड्यात सलग लसीकरण न करता एक ते दोन दिवसांचे अंतर ठेवून लसीकरण करण्यात येत आहे. तसेच सद्य:स्थितीत जिल्ह्यातील नऊ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

आहेर नको, रक्तदान करा! पुण्यातील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा; माजी मंत्र्यांकडूनही कौतुक  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Health News Covid Vaccination To 1965 People In Satara District