सातारा : स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीबाबत विशेष सभा घ्या; 'लोकशाही'ची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karad municipality

सातारा : स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीबाबत विशेष सभेची मागणी

कऱ्हाड (सातारा) ः स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोन वर्षे देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या कराड पालिकेची चौथ्या क्रमांकावर झालेली घसरणीत आपण कुठे कमी पडलो, अन्य पालिकांनी काय काम केले, त्याचा ऊहापोह होणे गरजेचे आहे. पालिकेची स्पर्धेत झालेल्या घसरणीच्या कारणांचा ऊहापोह व चर्चा करण्यासाठी विशेष सभा घ्यावी, अशी मागणी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी केली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या वर्षाच्या स्पर्धेचे मानांकन काल जाहीर झाले. त्यात कऱ्हाड पालिका चौथ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट झाले. त्याचे पडसाद आज उमटले. पालिकेच्या सभेत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील म्हणाले, प्रथम क्रमांक चुकला असला तरी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळालेले नाही. आपण कुठे कमी पडलो, इतर पालिकांनी काय काम केले, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलावून चर्चा करणे आवश्यक आहे. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर म्हणाले, ज्या पालिकांकडे एसटीपीसारखे प्रकल्प नाहीत, त्या पालिकांनी यश मिळवले आहे.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

पडद्यामागे काही झाले आहे, हे पाहण्याची आवश्यकता आहे. २० नोव्हेंबरला स्पर्धेतील गुणांकनाची माहिती मिळेल. त्यानंतर सबा घ्यावी. स्वच्छ सर्वेक्षणात चौथ्या क्रमांकावर झालेल्या घसरणीचा ऊहापोह महत्वाचा आहे. आपण कुठे कमी पडलो, याचाही विचार होणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांच्या अभिनंदन

जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनांदनाचा ठराव सभेत मांडला. ते म्हणाले,स्वच्छ सर्वेक्षणमधील कऱ्हाडची हॅटट्रीक हुकली असली तरी पालिका पहिल्या पाचमध्ये आहे. त्यासाठी परिश्रम घेणारे पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, नागरिक, संस्था, मुख्याधिकारी, स्वच्छतादूत यांचे अभिनंदन महत्वाचे आहे.

loading image
go to top