
Yuganayak’s Ideals Literary Meet in Satara: Dr. Vilas Khandaite chairs, Dr. Sharad Gaikwad inaugurates.
Sakal
सातारा : महाराष्ट्र विचार साहित्य संसद आणि विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांच्या संयुक्त विद्यामाने साताऱ्यात रविवारी (ता. २१) पहिले युगनायकांचे विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विलास खंडाईत यांची निवड झाली असून, उद्घाटक म्हणून साहित्यिक डॉ. शरद गायकवाड यांना निमंत्रित केल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण जावळे यांनी दिली.