सातारा : पर्यटकांना खुणावतोय उलटा धबधबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सडावाघापूर - उलटा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

सातारा : पर्यटकांना खुणावतोय उलटा धबधबा

तारळे : उशिरा सुरू झालेल्या दमदार पावसाने प्रसिध्द असलेला सडावाघापूरचा उलटा धबधबा (रिव्हर्स वॉटरफॉल) सुरू झाला असून पर्यटकांना तो खुणावू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच पुण्या-मुंबईवरूनही पर्यटक तेथे दाखल होत असून निसर्गाचा अविष्कार पाहून मंत्रमुग्ध होत आहेत.

तारळे-पाटण रस्त्यावरून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सडावाघापूरला प्रसिध्द उलटा धबधबा आहे. दरवर्षी पाऊस सुरू झाला की, पर्यटकांना या उलट्या धबधब्याचे वेध लागतात. जुलै-ऑगस्टमध्ये सडावाघापूर पठारावर पर्यटकांची मांदियाळी जमते. विकेंडला शेकडो गाड्या व हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. सडावाघापूर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिकांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटकही दाखल होत आहेत. सडावाघापूरने हिरवा शालू पांघरला आहे. विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारू घरे, थंडगार हवा, सोबत पाऊस,

दाबावर अविष्‍कार

सडावाघापूरच्या उलटा धबधब्याचा अविष्कार वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा दृष्टीस पडतो. मात्र, अनेकदा वाऱ्याअभावी पाणी उलटे फेकले जात नाही. अशावेळी प्रथमच आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता असते. मात्र, धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर, छोटे-मोठे धबधबे याचा मनसोक्त आनंद ते घेऊ शकतात.

Web Title: Satara Inverted Waterfall Marking Tourists

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top