IT Park Development Plans in Satara and Kolhapur
esakal
सातारा : आयटी पार्कसाठीच्या जागेवर आरक्षण टाकून ती एमआयडीसीकडे हस्तांतरित केली (Satara IT Park development news) जाणार आहे. सातारा व कोल्हापूर या दोन ठिकाणी होणाऱ्या आयटी पार्कमध्ये उद्योजक येण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत आयटी उद्योजकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. त्यातून काही उद्योग या ठिकाणी येतील. येत्या एक, दोन दिवसांत या कार्यशाळा कधी होणार हे निश्चित होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.