सातारा जिल्हा ‘जलजीवन मिशन’मध्ये अग्रेसर

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली आहेत.
JalJeevan Mission
JalJeevan MissionSakal

सातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली आहेत. या योजनेत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला असून, सुमारे पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी मिळणार आहे. (satara Jaljeevan Mission Updates)

ग्रामीण भागामध्ये पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी होण्याच्या उद्देशाने गावात प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. सन २०२४ पर्यंत ‘हर घर जल से नल’ हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

JalJeevan Mission
'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन

या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात, तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.

जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबे असून आतापर्यंत सुमारे चार लाख ५९ हजार ५५१ कुटुंबांना नळ कनेक्शन दिली आहेत. जिल्ह्यात एक हजार ७६३ गावांतील घरांना नळ कनेक्शन दिली आहेत. जलजीवन मिशनमध्ये पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे. सातारा जिल्ह्याने नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा जलजीवन मिशनमध्ये आघाडीवर राहिला आहे. १७५ योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निधीही वितरीत केला आहे.

JalJeevan Mission
राज्यात 45.77 लाख टन साखर उत्पादन

जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या योजनेमुळे जुन्या पाणीपुरवठा योजनाही निधी मिळाल्यामुळे त्या ऊर्जितावस्थेत येणार आहेत.

जिल्ह्याला सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यां‍ची तालुकानिहाय बैठका घेऊन योजनानिहाय सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.

- सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com