सातारा: सातारा- कागल महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, या दिरंगाईबाबत एनएचआयच्या अधिकाऱ्यांना आजच्या आढावा बैठकीत खडसावले आहे. या कामाला पाऊस उघडल्यावर पुन्हा गती दिली जाणार असून, मार्च २०२६ पूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे, तसेच कऱ्हाड- चिपळूण मार्गाचे चार वर्षे रखडलेले काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर संबंधितांवर राज्य सरकारकडून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.