Karad News : सातारा जिल्हा बंदचा विद्यार्थ्यांना फटका

शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर मिळाली बंद असल्याची माहिती
student
studentesakal

Maratha Reservation Protest - मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी जालना जिल्ह्यात लाट्याला केला. त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

त्याची माहिती शाळा व कॉलेज प्रशासनाला उशिरा कळाली मात्र विद्यार्थ्यांना ती माहिती न कळल्यामुळे विद्यार्थी शाळा कॉलेजासाठी आज सकाळपासूनच दाखल होत होते. शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना आज बंद मुळे सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे कळाले त्यामुळे त्यांना विनाकारण हेलपाटा घालावा लागला.

student
Udayanraje Bhosale : मराठा आरक्षणावरून राजकारण नको; उदयनराजे भोसलेंची शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोमवारी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्यात आले आहेत मात्र त्याची माहिती ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे ते आज सकाळपासूनच शाळेत व कॉलेजमध्ये येण्यासाठी नेहमीप्रमाणे आले होते.

student
Kaas Pathar वर फुलांच्या रंगछटा बहरण्यास सुरुवात; 'या' वेबसाइटवर जाऊन करा Online Booking, उद्यापासून रानफुलांची उधळण

कराडमधील शाळा कॉलेजमध्ये आल्यावर त्यांना सातारा जिल्हा बंदमुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे त्यांना परत घरी जावे लागले आज विनाकारण त्यांचा हेलपाटा झला.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com