सातारा : कास सांडव्‍याचे काम पूर्ण

उदयनराजेंनी केली पाहणी; पाणी साठवण होणार दुपटीने
 कास सांडव्‍याचे काम
कास सांडव्‍याचे कामsakal

सातारा : सातारा शहराचा जलदाता असणाऱ्या कास धरणाच्‍या सांडव्‍याचे काम पूर्ण झाले असून, त्‍याची पाहणी नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. पाहणीदरम्‍यान त्‍यांनी झालेल्‍या कामाबाबत समाधान व्‍यक्‍त करत पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी इतर सर्व कामे पूर्ण करण्‍याच्‍या सूचना केल्‍या.

शहराच्‍या काही भागांस कास धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. वाढणारी लोकसंख्‍या आणि शहराचा होणारा विस्‍तार लक्षात घेत कास धरणाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम सातारा पालिकेने हाती घेतले. यासाठी खासदार उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्‍य सरकारकडून आवश्‍‍यक असणारा निधी उपलब्‍ध करून दिला. या निधीतून भिंतीची उंची वाढविण्‍याचे हाती घेतलेले काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. या कामाची पाहणी आज उदयनराजे यांनी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्‍य अभियंता विजय घोगरे, मुख्‍याधिकारी अभिजित बापट, माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, प्रकल्‍प, तसेच पालिका अधिकारी उपस्‍थित होते.

उदयनराजेंनी भिंत, सांडवा व त्‍या परिसरातील इतर कामांची पाहणी करत पावसाळ्यापूर्वी बामणोली खोऱ्याला जोडणारे रस्‍ते, तसेच इतर सर्व कामे पूर्ण करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी या वेळी केल्‍या. सांडव्‍याचे काम पूर्ण झाले असून, त्‍याठिकाणची इतर तांत्रिक कामे युद्धपातळीवर पूर्ण होणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही त्‍यांनी यावेळी मांडले. धरणाच्‍या भिंतीची उंची वाढविल्‍यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात कासमधील पाणीसाठ्यात वाढ होणार असून, यापुढील काळात पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नसल्‍याचा विश्‍‍वासही उदयनराजेंनी या वेळी व्‍यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com