पाच दशके माणचे सत्ताकेंद्र राहिलेल्या पंचायतीवर 'महिलाराज'; मार्डी ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध

Satara Latest Election News
Satara Latest Election News
Updated on: 

दहिवडी (जि. सातारा) : "किंगमेकर' म्हणून ओळख असलेल्या (कै.) आमदार सदाशिवराव पोळ यांचे गाव असलेल्या मार्डी ग्रामपंचायतीची निवडणूक गावाच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध झाली. 13 महिलांची सदस्यपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतीत महिलाराज आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाकेला नेते व ग्रामस्थांची साथ मिळाल्याने ही ऐतिहासिक घटना घडू शकली. 

कोकण विभाग औद्योगिक विकास महामंडळाचे अतिरिक्त मुख्य अधिकारी पोपटराव मलिकनेर, डॉ. माधवराव पोळ, काकासाहेब देसाई, जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, पालघरचे विभागीय कृषी अधिकारी महेंद्र सावंत, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, कोषागार अधिकारी संजय राजमाने यांनी 20 डिसेंबर रोजी ग्रामस्थांची बैठक बोलवून बिनविरोधचा ठराव केला. 27 रोजी बैठकीत उमेदवार निवडण्यात आले. 30 रोजी अर्ज भरण्यात आले; पण या सर्व चर्चेला सुरुंग लागला. 13 जागांसाठी 25 अर्ज भरले गेले. पुन्हा एकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मनधरणी करण्यात आली.

हेही वाचा : कऱ्हाडातील पाटणात 18 ग्रामपंचायती बिनविरोध; तालुक्‍यात 775 उमेदवार रिंगणात
 
डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, राजू पोळ व डॉ. उज्ज्वल काळे, दीपक पोळ या नेतेमंडळींनी मोठेपणा दाखवत बिनविरोधला पाठबळ दिले. वरिष्ठांच्या शब्दाला मान देत अखेर इतर इच्छुकांनी आपले अर्ज माघारी घेतले आणि अर्ज काढण्याच्या शेवटच्या क्षणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळाले. अपवाद वगळता उच्च विद्याविभूषित, समाजकारणाची आवड असणाऱ्या महिलांना सदस्यपदी संधी देण्यात आली आहे. त्यात सुरेखा शिंदे, मेघाराणी पवार, संजीवनी कबाडे, संजीवनी पवार, मंगल मोटे, अलका पोळ, सारिका जाधव, मंगल पोळ, ऍड. सीमा पोळ, संगीता दोलताडे, शुभांगी सावंत, अक्षता लोखंडे, रूपाली महामुनी या 13 महिलांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. 

मार्डी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली. या सर्वांच्या एकजुटीच्या बळावर मार्डी सर्वांगीण प्रगती करेल याची खात्री आहे. 
- पोपटराव मलिकनेर, अतिरिक्त मुख्य अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ, कोकण विभाग 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com