कोयना पुलावरून आठवडाभरात चारचाकी वाहतूक; माजी मुख्यमंत्र्यांची माहिती

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील जुन्या कोयना पुलावरून किती क्षमतेची वाहने जाऊ शकतात, याची तपासणी बांधकाम विभाग व मुंबई आणि कऱ्हाडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पथकाने केली. येथील जुन्या कोयना पुलावरून आठवडाभरात चारचाकी हलकी वाहने धावतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली. 

येथील ब्रिटिशकालीन जुना कोयना पुलाच्या दुरुस्तीनंतर त्यावरून हलक्‍या वजनाची चारचाकी वाहने व रिक्षा जाऊ शकतील का, याची तपासणी बांधकाम विभागाच्या विशेष विभागाचे सहायक अभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता प्रमोद मोटे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. अभय बांबोले, प्रथमेश भोईर, प्रशांत बावीसकर, कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रफुल्ल देशपांडे यांच्या पथकाने केली. त्यासाठी पुलावर लोडचे आठ डंपर लावले होते. पुलाखाली लावलेल्या अत्याधुनिक यंत्राद्वारे 24 तासांत दर तासाला पुलाची वजन क्षमता तपासण्यात आली. त्याचा अहवाल लवकरच येणार आहे. त्या पुलाची पाहणी आज पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. या वेळी ऍड. उदयसिंह पाटील, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक राजेंद्र माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, नगर अभियंता एन. एस. पवार, झाकीर पठाण, सिद्धार्थ थोडवडे, रमेश वायदंडे, ज्ञानदेव राजापुरे आदी उपस्थित होते. 

पुलाच्या पाहणीनंतर श्री. चव्हाण म्हणाले, "कोयना नदीवरील लोखंडी पूल वाहतुकीसाठी बंद आहे. वर्षापासून हा पूल हलक्‍या चारचाकीसाठी वापरता येईल का, याची बांधकाम विभागाबरोबर चर्चा सुरू होती. त्यादृष्टीने पुलाची दुरुस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे 150 वर्षे जुना लोखंडी पूल हलक्‍या चारचाकी वाहनांसाठी खुला करण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या वजन क्षमतेची चाचणी करण्यात आली आहे. आठवडाभरात चारचाकी वाहनांना वाहतुकीसाठी या पुलावरून परवानगी देण्यात येईल. त्यामुळे महामार्गावरील पुलावरील ताण आणि कोल्हापूर नाक्‍यावरील वाहनांची कोंडी टाळणे शक्‍य होणार आहे.'' 

कृपा करून हेल्मेट वापरा 

रस्ता सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्व दुचाकीस्वारांनी कृपा करून हेल्मेट वापरावे, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. बहुतेक दुचाकीधारक हेल्मेट वापरत नाहीत. अपघाताचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Satara News 17 Year Old Girl Dies In Family Dispute Over Mobile Phone And Television Father Loses His Temper
why Tapoḷa Ahir bridge is closed for traffic
Satara 17-year-old girl death case
Marathi News Esakal
www.esakal.com