esakal | सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम; काेयनेसह महाबळेश्वरात जाेर
sakal

बोलून बातमी शोधा

rain

सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम; काेयनेसह महाबळेश्वरात जाेर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागांत रात्रीपासून सुरु असलेली पावसाची रिमझिम आजही (बुधवार) सुरुच आहे. सातारा शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज शहरात सकाळापासून पावसाचा जाेर कमी झाला. याबराेबरच काेयना धरण क्षेत्रात पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील क-हाड शहर, काेपर्डे हवेली, चाफळ, माेरणा, तारळे, कसणी, जावळीमधील करहर, साता-यानजकीच्या कास, बामणाेली, वाई शहरासह नजीकच्या कवठे गावात पावसाची संततधार सुरु आहे. (satara-latest-news-koyna-dam-rain-update)

जिल्ह्यातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. रात्री झालेल्या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. पावसामुळे भात खाचरे भरू लागली आहेत. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पावसाबराेबरच अधूनमधून ऊन पडत आहे.

हेही वाचा: आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. आज सकाळी आठ वाजताच्या माहितीनूसार धरणात तीन हजार 078 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणात २८.71 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेत 53 मिलिमीटर, नवजा येथे 58 मिलिमीटर तसेच महाबळेश्वर येथे 61 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: वाह, क्या बात है! निंबोडीच्या 'आकाश'ची लेफ्टनंट पदाला गवसणी

loading image