esakal | सातारा : दक्षिण तांबवेत सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याचा पुन्हा हल्ला

सातारा : दक्षिण तांबवेत सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : डोंगरात चरायला नेलेली गाय घरी येऊन येत असताना सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने पाठीमागुन येऊन हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास दक्षिण तांबवे (ता. कऱ्हाड) येथे घडली. राज दिपक यादव असे संबंधित मुलाचे नाव असुन त्याचे मित्र ओरडल्याने बिबट्याने तेथुन डोंगराम धुम ठोकली. या हल्यात राजच्या पाठीला दुखापत झाली आहे. दरम्यान यामुळे परिसरातबिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.  

तांबवे, दक्षिण तांबवे, डेळेवाडी, आरेवाडी, पाठरवाडी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. दोन दिवसापुर्वी त्याने तांबवे गावात येवुन कुत्र्याचा फडशा पाडला होता. कालच एका युवक शेतकऱ्याला शेतात मुक्त संचार करताना दिसला होता. त्याची व्हीडीओही संबंधित शेतकऱ्याने काढले होता. दरम्यान बिबट्याच्या हल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आज सायंकाळी सहाच्या सुमारास राज यादव हा दक्षिण तांबव्याच्या डोंगरात चरायला सोडलेली गाय घेऊन येण्यासाठी गेला होता.

हेही वाचा: पोलिस जनता दरबारात बारामतीत एकाच दिवशी १२८ अर्जांवर निर्णय

त्याचदरम्यान बिबट्या एका कुत्र्याच्या पाठीमागे धावत होता. कुत्र्याने हुसकावणी दिल्यावर बिबट्याने गाय घेऊन येणाऱ्या राजवर पाठीमागुन हल्ला केला. त्यादरम्यान ही घटना पाहुन त्या परिसरात असणारे त्याचे मीत्र ओरडले. त्यामुळे बिबबट्याने दक्षिण तांबवेच्या डोंगरात धुम ठोकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. राज याच्या पाठीला दुखापत झाली असुन बिबट्याच्या नख्यांचे व्रण उठले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ, शेतकऱ्यांतुन होत आहे.

loading image
go to top