

Leopard Terror in Satara Intensifies After 26 Month Old Toddler Dies Villagers Fear More Attacks in Nhalevadi
sakal
-सुधीर जाधव
सातारा : न्हाळेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या २६ महिन्यांच्या जय संदीप खंडागळे या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांच्या मनातील भीती अधिकच गडद झाली आहे. बिबट्याच्या वावरामुळे सायंकाळनंतर घराबाहेर पडणेही धोक्याचे वाटत असून, शक्यतो सातच्या आत घर गाठण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. शेती, घराभोवतालचा परिसर आणि रस्त्यावर वावरताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत आहे. लहान मुलांना घराबाहेर पाठवायचे कसे? हा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे.