Karad News : खासदार उदयनराजे भोसले यांचा कॉग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

सातारा लोकसभा मतदार संघाच्या संपर्क दौऱ्यादरम्यान खासदार भोसले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान खासदार उदयनराजे भोसले बोलत होते.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosaleesakal

कऱ्हाड - सातारा लोकसभेचा खासदार जातीयवादी पक्षांच्या विचाराचा होवु देणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन समजला जात होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या योजना कॉंग्रेसच्या काळात का राबवल्या गेल्या नाहीत असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी आज बुधवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे उपस्थित केला. कॉंग्रेसच्या काळात उतमात झाला होता असेही ते म्हणाले.

सातारा लोकसभा मतदार संघाच्या संपर्क दौऱ्यादरम्यान खासदार भोसले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान ते बोलत होते. सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे भरत पाटील, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, पैलवान धनाजी पाटील, सुनिल काटकर आदि उपस्थित होते.

दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी नसताना कृष्णा खोरे विकास महामंडळाचा प्रकल्प मी मंजुर केला असे सांगुण खासदार भोसले म्हणाले, त्या योजनेव्दारे दुष्काळी भागाला पाणी मिळाले. जसा विश्वास निर्माण झाला तसा ठिकठिकाणी परिवर्तन झालेले पहायला मिळत आहे. कॉंग्रेच्या काळात एवढा उतमात झाला होता की मला त्याचे नवल वाटायचे.

कॉंग्रेसवाले दगडाला शेंदुर जरी फासला तरी लोक निवडणुन देतील असे म्हणत होते. कॉंग्रेसच्या ज्या नेत्याने भाजप हा जातीयवादी पक्षाचा खासदार होवु देणार नाही असे विधान केले असेल त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या काळात कृष्णा खोरे सारखा प्रकल्प का राबवला नाही हे जाहीर करावे.

मिस मॅनेजमेंटमुळे जरंडेश्वरचे खासगीकरण

सहकारी तत्वावर स्थापन झालेले कारखाने ही सर्वसामान्यांचे हित समोर ठेवुन सुरु झालेले आहेत. वसंततदादा पाटील आणि अनेक दिग्गजांच्या माध्यमातुन सहकार चळवळ उभी राहिली आहे असे सांगुण खासदार म्हणाले, कॉंग्रेसच्या काळात खिरापत वाटल्यासारखे कारखान्यांना परवाने दिले जात होते असे सांगुण खासदार भोसले यांनी जरंडेश्वर कारखान्यामध्ये मिस मॅनेजमेंट झाल्यामुळे सहकारी तत्वावरील खासगीकरण करण्यात आले. मी खासगीकरणाचे समर्थन करत नाही.

मी सर्व समाजाचे समर्थन करतो

मराठा आरक्ष प्रश्नी ते म्हणाले, जातीनिहाय जनगणना शासनाने करणे गरजेचे आहे. मात्र त्याला २० वर्षे झाली ती झालेली नाही. २३ मार्च १९९४ चे नोटीफीकेशन आहे. त्यावर आरक्षण देण्यात आले. त्या-त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी पुढे त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायला हवा होता असे सांगुण ते म्हणाले, मी सर्वच समाजाचे समर्थन करतो.

कोणत्याही जातीधर्मातील तरुण असल्यावर त्यांना इकॉनॉमीकली बॅकवर्ड म्हंटल्यावर त्याला सर्व सोयी लागु होतात. अनेक गरीब लोक मराठा समाजात आहेत. मुलांना फी भरायला पैसे नसतात त्यावेळी त्या लोकांना काय वाटत असेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com