Satara News:'साताऱ्याचे मराठा बांधवही जरांगेंसाठी मुंबईत जाणार'; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, समन्वयकांची तयारी..

Coordinators from Satara prepare: येत्या २८ ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या सोयी सुविधांची काटेकोर व्यवस्था केली जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात तालुकानिहाय बैठकांचे नियोजन पूर्ण झाले.
Maratha community members from Satara preparing to join Jarange’s Mumbai protest for reservation demand.
Maratha community members from Satara preparing to join Jarange’s Mumbai protest for reservation demand.Sakal
Updated on

सातारा: मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाशी संघर्ष करणारे अंतरवाली सराटीचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आझद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय तेथून मागे हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यातील मराठा समन्वयकांनी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com