esakal | पन्नास वर्षांत प्रथमच महिलेस मिळाला सरपंचपदाचा मान
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास वर्षांत प्रथमच महिलेस मिळाला सरपंचपदाचा मान

गत पंचवार्षिकचा अपवाद वगळता आतापर्यंतच्या तेथील निवडणुका बिनविरोध झाल्या हाेत्या.

पन्नास वर्षांत प्रथमच महिलेस मिळाला सरपंचपदाचा मान

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : दुर्गम वाल्मीक पठारावरील असवलेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान प्रथमच एका महिलेला मिळाला आहे. तेथील सरपंचपदी मनीषा अशोक असवले, तर उपसरपंचपदी विलास शंकर असवले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.

गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबतचा निर्णय ग्रामदैवत श्री पावणाईदेवीच्या मंदिरात एकत्र जमून घेण्याची असवलेवाडीची जुनी परंपरा आहे. गत पंचवार्षिकचा अपवाद वगळता आतापर्यंतच्या तेथील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात आहे. मनीषा असवले, विलास असवले, भाऊसाहेब जाईगडे, वैशाली असवले, विमल कंक या पाच सदस्यांची निवड करण्यात आली. आरक्षित प्रवर्गातील दोन उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या जागा रिक्त राहिल्या. सरपंचपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आरक्षित होते. नुकत्याच आयोजिलेल्या बैठकीत सरपंचपदी मनीषा असवले तर उपसरपंचपदी विलास असवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित सदस्यांसह माजी सरपंच रामचंद्र असवले, निवृत्त पोलिस पाटील कृष्णत असवले, तुकाराम असवले, गणपत असवले, धनाजी असवले, विठ्ठल असवले, जयवंत असवले, शंकर काळे, धोंडिराम जाईगडे, नाथाजी असवले, शंकर असवले, 
सीताबाई असवले आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. पवार यांनी काम पाहिले. त्यांना श्री. भिसे, ग्रामसेवक श्री. पिसाळ यांनी साह्य केले. "विविध विकासकामे, एकजूट आणि उपक्रमांव्दारे असवलेवाडीने निर्माण केलेली ओळख आणखी ठळक होण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे,' असे आवाहन माजी सरपंच रामचंद्र असवले यांनी केले.

झोपडी पेटवून दिल्याने पिंप्रदला महिलेचा होरपळून मृत्यू; पाच जणांवर गुन्हा

वाईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी; पालखी, सांस्कृतिक कार्यक्रमास निर्बंध

मोदींचा विषयच नाही; शरद पवारांनीच मराठा आरक्षणात लक्ष घालावे, अन्यथा उद्रेक : उदयनराजे गरजले

देशात नावाजलेला घनकचरा प्रकल्प घोटाळ्याचा केंद्रबिदू; पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top