esakal | सर्वाधिक रुग्णसंख्येने धास्तावले सातारकर; लाॅकडाउनच्या दिशेने पावले
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

सर्वाधिक रुग्णसंख्येने धास्तावले सातारकर; लाॅकडाउनच्या दिशेने पावले

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा: सातारा जिल्ह्यात साेमवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 2502 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 36 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील काेविड 19 चा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यात आगामी काळात कडक लाॅकडाउन करणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले आहे.

सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 126 (5240), कराड 233 (16378), खंडाळा 157 (6765), खटाव 173 (9350), कोरेगांव 192 (9252),माण 337 (6980), महाबळेश्वर 9 (3379), पाटण 136 (4463), फलटण 388 (13977), सातारा 585 (25211), वाई 151 (8289 ) व इतर 15 (594) असे आज अखेर एकूण 109878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

याबराेबरच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (105), कराड 0 (449), खंडाळा 0 (85), खटाव 6 (268), कोरेगांव 5 (239), माण 4 (147), महाबळेश्वर 0 (32), पाटण 1 (120), फलटण 1 (194), सातारा 15 (770), वाई 3 (201) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2610 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान काेविड 19 बाधितांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभुमीवर आज (साेमवार) जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी काही सूचना जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना पालकमंत्री बाऴासाहेब पाटील म्हणाले सातारा जिल्ह्यात उद्या (मंगळवार, ता.4 मे) पासून कडक लाॅकडाउन करणार आहाेत. आज (साेमवार) सायंकाळी त्याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.

तेरे जैसा यार कहाँ! वडुजात मित्राच्या मदतीला धावली 'मैत्री'

प्रांताधिकाऱ्यांनी 'आरोग्य'ला पाजले सुरक्षेबाबतचे डोस

loading image