
सावर्डे (ता. चिपळूण) येथील अध्यापक महाविद्यालयात (कै.) जाधव यांनी शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर ते आसंगी तुर्क (ता. जत) येथे विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र, त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
सातारा : वीस टक्के अनुदानावरील शाळेत शिक्षक म्हणून काम करत कुटुंबाचा गाडा चालविताना ऐन उमेदित निधन झालेल्या संभाजी जाधव (उमदी, ता. जत. जि. सांगली) येथील आपल्या मित्राच्या कुटुंबास 30 हजार रुपयांची मदत (कै.) जाधव यांच्या वर्गमित्रांनी नुकतीच दिली. आपल्या मित्राचे कुटुंब काहीसे सावरले जावे, यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सावर्डे (ता. चिपळूण) येथील अध्यापक महाविद्यालयात (कै.) जाधव यांनी शिक्षण घेतले होते. ते नम्र आणि मनमिळावू होते. त्यामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. शिक्षणानंतर ते आसंगी तुर्क (ता. जत) येथे विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते. मात्र, त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. टप्पा अनुदानित शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांना कोणतेही सेवा संरक्षण नसल्याने शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत झाली नाही.
दुचाकींच्या चाकाचा आऊट काढत आयुष्याच्या चाकांना गती; महेशची अपंगत्वावर जिद्दीने मात
त्यामुळे (कै.) जाधव यांच्या निधनाने आर्थिक संकटात सापडलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी बीएडचे त्यांचे वर्गमित्र पुढे सरसावले. बीएड माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन चव्हाण, दीपक जगदाळे (सातारा), प्रभात मिस्त्री, अमोल गिरकर (रत्नागिरी), प्रमोद वाघमारे (सिंधुदुर्ग) यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. तसेच 30 हजार रुपयांची मदत केली. मित्राच्या संकटात सापडलेल्या कुटुंबीयांना मदत करून या मित्रांनी जपलेली समाजिक बांधिलकी कौतुकास पात्र ठरली आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे