esakal | घाबरु नका; Home Isolation मधील 4913 रुग्ण बरे झाले

बोलून बातमी शोधा

home isolation

घाबरु नका; Home Isolation मधील 4913 रुग्ण बरे झाले

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचे (Coronavirus) संक्रमण वाढले आहे, रुग्णालयांत जागा नाही, बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे भीतीही वाढते आहे. रुग्णालयांत बेड नसल्याने घरीच आयसोलेट व्हावे लागते आहे. तालुक्‍यातील सहा हजार रुग्ण गृह विलगीकरणातून (Home Isolation) राहून उपचार घेत आहेत. त्यातील 83.13 टक्के रुग्णांनी घरच्या घरीच कोरोनावर मात केली आहे. तब्बल चार हजार 913 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे बेड नाही मिळाला तरी त्रागा न करता धाडसाने व नियमात राहून कोरोनाशी सामना केल्यास तो बरा होतो, हेच या कोरोनाग्रस्तांनी दाखवून दिले आहे. (Satara Marathi News Karad Covid 19 Paitents Recovered Home Isolation)

होम आयसोलेशनमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनामुक्तीचा तालुका म्हणून कऱ्हाडची नोंद आहे. रुग्णालयातील बेडसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्यात घालमेल होते आहे. त्याकडे पाहून कोरोनाची भीती नैसर्गिक आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील होम आयसोलेशनमधील कोरोनामुक्ती दिलासा देते आहे. तालुक्‍यातील तब्बल 83.13 टक्के कोरोनाग्रस्तांनी घरीच राहून कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाचे प्रयत्न आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीमुळे शक्‍य झाल्याचे वास्तव आहे. कोरोनामुक्तीचा वाढता टक्का निश्‍चित आधार देणाराच ठरत आहे. कोरोनाचे संक्रमण वाढल्याने गावोगावी रुग्ण वाढत आहेत. त्या प्रमाणात रुग्णालयांत बेड उपलब्ध नसल्याचे वास्तवही आहे. त्यामुळे अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्या रुग्णांना घरच्या घरीच उपचाराची सोय केली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील तब्बल सहा हजार रुग्णांवर घरच्या घरीच उपचार सुरू आहेत. चार हजार 913 रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील 981 रुग्ण ऍक्‍टिव्ह आहेत. मृतांची संख्या केवळ 16 आहे. त्यामुळे होम आयसोलेशनच्या कोरोनाग्रस्तांची मुक्ती 83.13 टक्के, ऍक्‍टिव्हची 16.69, तर मृतांची टक्केवारी 0.25 टक्के आहे. 13 हजार 249 कोरोनाग्रस्तांपैकी 11 हजार 401 रुग्ण कोरोनामुक्त आहेत. कोरोनाग्रस्तांपैकी 66.14 टक्के रुग्ण होम आयसोलेशन, तर 33.85 टक्के कोरोनाग्रस्त हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्या प्रमाणात रुग्णालयांत बेडही उपलब्ध नाहीत. ती स्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर घरीच उपचार केले जात आहेत. होम आयसोलेट झालेल्या रुग्णांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. त्यांचा कोरोनामुक्तीचा टक्काही वाढत आहे.

- संगीता देशमुख, वैद्यकीय अधिकारी, कऱ्हाड तालुका

हेही वाचा: आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा