सौरभ पाटलांच्या तोंडाला कुलूप होते का? भाजप नगराध्यक्षा आक्रमक

सौरभ पाटलांच्या तोंडाला कुलूप होते का? भाजप नगराध्यक्षा आक्रमक
Updated on: 

कऱ्हाड : सत्तेतील जनशक्ती आघाडीचे नेते कोणती जबाबदारी घेण्यास तयार नसतील, तर त्यांनी त्यांच्या विषय समित्यांच्या सभापतींचे राजीनामे देऊन सत्तेतून बाहेर पडावे, असे खुले आव्हान भाजपचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषेदत दिले.
 
पालिका अर्थसंकल्पाच्या सूचनेतील त्रुटी दुरुस्त करून उपसूचनेद्वारे आलेले बदल स्वीकारून सूचना मंजूर केली आहे, असेही शिंदे, श्री. पावसकर यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नगरसेवक फारूक पटवेकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार उपस्थित होते. श्री. पावसकर म्हणाले, ""स्थायी समितीच्या चार बैठकांत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. त्यात जनशक्तीचे आठ, तर लोकशाहीचा एक सदस्य आहे, तरीही दोघांनी अर्थसंकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. तुम्ही स्थायीच्या बैठकीला जात होतात, की चहा प्यायला. बहुमत आहे, सगळे सभापती मग अधिकार नाही, अशी ओरड चुकीची आहे.

अर्थसंकल्पाच्या प्रती चार दिवस आधी दिल्या होत्या. मात्र, बैठकीत दंगा करण्यासाठी त्यांनी तेथे उपसूचना दिली. काही महिन्यांवर निवडणुका असल्याने प्रसिद्धीसाठीच ते हे सार करत आहेत. चार वर्षांत पालिकेत येत नव्हता, गायब होतात. अलीकडे जनशक्तीच्या गटनेत्यांचा राबता वाढला आहे. त्यालाही निवडणुकाच कारणीभूत आहेत.'' उपसूचनेत काही मुद्दे मतदार, निवडणुका व वॉर्ड डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी घेतले आहेत.

कऱ्हाड : गदारोळातच 134 कोटी 79 लाख 20 हजारांचा अर्थसंकल्प मंजूर

राष्ट्रीय मछली विकास बोर्डाने फिश मार्केट बांधकामाची जबाबदारी मछली विकास बोर्डाकडे होती. कऱ्हाडमध्ये फिश मार्केट मंजूर झाले होते. त्यासाठी माजी नगरसेवक जिल्हा मत्स्य व्यवसाय संघाचे अध्यक्ष श्रीकांत मुळे यांनी कष्ट घेतले होते. मात्र, एका भाडेकरूच्या किरकोळ आक्षेपाने फिश मार्केटचे काम होऊ देण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले. 

सौरभ पाटलांच्या तोंडाला कुलूप होते का? 

लोकप्रतिनिधींना निधी मागण्यावरून लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांच्यावर नगराध्यक्षा शिंदे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या, ""सौरभ पाटील पालकमंत्र्यांच्या घरचे आहेत. पुतणे आहेत. मात्र, पालकमंत्र्यांचे बालक आता जागे झाले आहे. ते आम्हाला सुचवत आहेत. मात्र, तुम्ही गावासाठी का निधी मागत नाही. बैठकीत त्यांनी जे मुद्दे मांडले ते त्यांनी स्थायी समितीत का मांडले नाहीत. स्थायी समितीच्या सभेत ते तोंडाला कुलूप लावून बसले होतो का.'' 
 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khambatki Ghat traffic jam latest news
Farmers Demand ₹5,500 Per Tonne for Sugarcane
cotton cultivation in Phaltan taluka 2026
Raju Shetti warning to sugar factories
Marathi News Esakal
www.esakal.com