esakal | 'माझे आई-वडील व मुलाची काळजी घ्या'; व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवून क्रिकेटपटूची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime news of satara

एका गुणी खेळाडूच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.

'माझे आई-वडील व मुलाची काळजी घ्या'; व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवून क्रिकेटपटूची आत्महत्या

sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर : स्थानिक युवा क्रिकेटपटू संदीप सुभाष भिलारे (वय 35 रा. गणेश नगर सोसायटी) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. उमदया खेळाडुच्या अकाली जाण्याने साेमवारी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

येथील स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यात नेहमी चमकणारा अष्टपैलु खेळाडू संदीप सुभाष भिलारे याने आपल्या मोबाईल स्टेटस्ला माझे आई वडिलांची व माझ्या मुलाची काळजी घ्या, बस शेवट, असा मजकुर ठेवला होता. संदीपचा हा स्टेटस् पाहुन मित्र व नातेवाईक घाबरले. काही मित्रांनी संदीपच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. संदीपचा मेव्हणा सागर शिंदे हा आपल्या मित्रांना बरोबर घेवुन संदीपच्या घरी गेला. तेथे संदीपच्या घराचा दरवाजा आतुन बंद होता. संदीप संदीप अशा हाका मारल्या, दारवरची बेल वाजविली तरी संदीपने घराचा दरवाजा उघडला नाही म्हणुन सागरने दरवाजा जबरदस्तीने उघडला असता संदीपने साडीच्या मदतीने गळफास घेवुन आपले जीवन संपविल्याचे दिसुन आले. 

संदीपला तातडीने येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैदयकिय अधिकारी यांनी तपासुन संदीप याचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट केले. संदीप याचा प्रेमविवाह झाला होता. त्याला एक वर्षांचा मुलगा आहे. त्याचा पहीला वाढदिवस 15 जानेवारीला मोठया थाटामाटात साजरा केला होता. अशा गुणी खेळाडुच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : गावच्या सर्वांगीण विकासासाठी गट- तट विसरून झाली सरपंच निवड

तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी आफ्रिकन गुलाम असलेल्या माणसाने वसवले औरंगाबाद

ही दाेस्ती तुटायची नाय! शशिकांत शिदें

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचा अजब कारभार; महिलांसह विद्यार्थी त्रस्त

पुसेगाव समस्यांच्या विळख्यात, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

संपादन - सिद्धार्थ लाटकर

loading image
go to top