esakal | Oxygen अभावी खासगी हॉस्पिटलची कोविडची मान्यता रखडली

बोलून बातमी शोधा

Hospital Logo
Oxygen अभावी खासगी हॉस्पिटलची कोविडची मान्यता रखडली
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालये मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये 16 हजार 626 इतके कोरोना संक्रमित रुग्ण (covid 19 paitent) उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात (Home Isolation) उपचार घेत आहेत. एकूण 82 हॉस्पिटलपैकी 58 खासगी हॉस्पिटल यांना कोविड हॉस्पिटलमध्ये (Covid Hospital) रुपांतरित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. ऑक्‍सिजन (Oxygen) उपलब्धतेनुसार उर्वरित खासगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलसाठी परवानगी दिली जाईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली. (satara marathi news no permission private hospital covid19 oxygen)

सद्य:स्थिती जिल्ह्यात एकूण 20 खासगी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्याकडील सुरू असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केले आहेत. तथापि, ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या कमतरतेमुळे या खासगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करून मंजुरी देणे उचित ठरणार नाही, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, ""भविष्यात ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची आवश्‍यकतेनुसार उपलब्धता झाल्यास या सर्व 20 खासगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित करण्याबाबत तत्काळ मंजुरी दिली जाईल.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात दैनंदिन लागणाऱ्या ऑक्‍सिजनपेक्षा कमी पुरवठा होत आहे, तसेच अत्यावश्‍यक रुग्णांना उपचाराकरिता आवश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनही कमी प्रमाणात उपलब्ध आहे.''

जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालय आणि शासनस्तरावर ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध होण्याकरिता युद्धपातळीवर पाठपुरावा करत आहे. लवकरच जिल्ह्यासाठी आवश्‍यक असणारा ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन्स उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लि करा

हेही वाचा: काळाची झडप; झगलवाडीतील युवकासह कवठेतील शेतक-याचा मृत्यू

हेही वाचा: अजित पवारांच्या निर्णयाची अंमलबजावणी हाेईना : डाॅ. भारत पाटणकर

(satara marathi news no permission private hospital covid19 oxygen)