esakal | अजित पवारांच्या निर्णयाची अंमलबजावणी हाेईना : डाॅ. भारत पाटणकर
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Bharat patankar

अजित पवारांच्या निर्णयाची अंमलबजावणी हाेईना : डाॅ. भारत पाटणकर

sakal_logo
By
सिध्दार्थ लाटकर

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत महाराष्ट्रदिनी जमीन वाटपाचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे अद्ययावत संकलन रजिस्टर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला 16 मेपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत संकलन पूर्ण न झाल्यास 17 मेपासून प्रकल्पग्रस्त आंदोलन करतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

यावेळी हरिश्‍चंद्र दळवी, मालोजी पाटणकर, प्रकाश साळुंखे, संतोष गोटल, बळीराम कदम, सचिन कदम, महेश शेलार, चैतन्य दळवी आदी उपस्थित होते. या आंदोलनात सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व अहमदनगर जिल्ह्यांमधील 350 वसाहतींतील सुमारे 50 हजार स्त्री-पुरुष भाग घेतील. कोरोनात सर्व नियम पाळून हे आंदोलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोयना धरणग्रस्तांचे प्रमाणित व पात्र प्रकल्पग्रस्तांचे अद्ययावत संकलन रजिस्टर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला वेळ दिला. गेल्या तीन वर्षांत माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या बैठकांतील निर्णयांची जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी झाली नाही. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या सर्व कामांसाठी स्वतंत्र कार्यालय प्रस्थापित करावे, पात्र प्रकल्पग्रस्तांचे अद्ययावत सर्वांगीण प्रमाणित संकलन रजिस्टर तयार करावे, आठ किलोमीटरमध्ये जमीन वाटप होऊ शकेल, अशा गावठाणांचा पुनर्वसन आराखडा तयार करावा, असे आदेश देण्यात आले होते. याबाबत अंमलबजावणी न झाल्याने जमीनवाटप सुरू होईपर्यंत लढत राहण्याचा निर्णय कोयना प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.

काळाची झडप; झगलवाडीतील युवकासह कवठेतील शेतक-याचा मृत्यू

या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीपूर्वी सहा वर्षे कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणित संकलन रजिस्टर अद्ययावत होत नाही, तोपर्यंत कोणासही जमीन वाटप करण्यात येऊ नये, अशी भूमिका चळवळीने घेत वाटप थांबवले होते. परंतु, बोगस खातेदारांना जमीन वाटप करण्यात आले, ही वस्तुस्थिती आजही नाकारता येत नाही. त्यामुळे, चळवळीने जमीन वाटप थांबवणे प्रशासनाला भाग पाडल्याचे श्री. पाटणकर यांनी सांगितले.

'अजित पवारांना शोधा...! घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय'

आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

loading image