शिबेवाडीत घराची पडझड; मंद्रुळकोळ्यात पंपगृहावर झाड कोसळले

वादळी पावसाने परिसरात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडल्याचे दिसून येत आहे.
loss of house in debhewadi
loss of house in debhewadisystem

ढेबेवाडी (जि. सातारा) : डोंगरमाथ्यावरील शिबेवाडी (गुढे, ता.पाटण) येथील घराची शनिवारी रात्री वादळी पावसात (rain) पडझड झाली. घराची मोठी भिंत बाहेरच्या बाजूला कोसळल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मंद्रुळकोळे (mundralkole) येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या पंपगृहावर रात्री झाड कोसळल्याने वीज जोडणीच्या केबल तुटून पाणीपुरवठा बंद झाला होता. (satara marathi news rain debhewadi loss houses)

डोंगरावरील शिबेवाडीतील श्रीमती शांताबाई निवृत्ती शिबे यांच्या घराची सुमारे 20 फूट लांबीची दगड व विटांमध्ये बांधलेली भिंत काल सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. घरात शांताबाई व त्यांचा नातू असे दोघेच राहण्यास असतात. कुटुंबातील अन्य सदस्य मुंबईस राहतात. घटना घडली तेव्हा घरात शांताबाई विश्रांती घेत होत्या, तर नातू चौकटीजवळ थांबलेला होता. भिंत पडल्याचा मोठा आवाज कानावर आल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी घटनास्थळी धावले. बाहेरील बाजूला भिंत कोसळल्याने सुदैवाने जीवित तसेच घरातील प्रापंचिक साहित्याची हानी टळल्याचे दिसून आले.

loss of house in debhewadi
साता-यात संततधार सुरुच; तापाेळ्यासह महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस

ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, मंद्रुळकोळे येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कदम आवाडाजवळील पंपगृहावर रात्री झाड कोसळल्याने पंपगृहाचे नुकसान झाले असून, वीज जोडणीची केबल तुटल्याने पाणीपुरवठाही बंद आहे. सरपंच अमोल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. वादळी पावसाने परिसरात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com