'आमचा सचिन सुखरूप येईल असे वाटत हाेते'; गावकरी शाेकसागरात

sachin patane
sachin patanesystem

केळघर (जि. सातारा) : तौक्‍ते चक्रीवादळात (tauktae cyclone) मुंबईजवळ अरबी समुद्रात (arabian sea) ओएनजीसीचे (ONGC) कॉन्ट्रॅक्‍ट असलेल्या ऍफकोन इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड या कंपनीच्या जहाजातून बेपत्ता झालेले गवडी येथील वरिष्ठ अभियंता सचिन जगन्नाथ पाटणे यांच्यावर गवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटणे यांचा गेले सोळा दिवस झाले तरी ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे पाटणे कुटुंब तणावात होते. याबाबत सकाळ माध्यम समूहाने विविध फ्लॅटफार्मवर याचे वृत्त प्रसिद्ध केले हाेते. यामध्ये जिल्ह्यातील खासदारांना सचिनच्या शोधकार्यासाठी लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत खासदार श्रीनिवास पाटील व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पाठपुरावा करून सचिनचा मृतदेह मिळण्यासाठी प्रयत्न केले. गवडी येथे गुरुवारी (ता.3) शोकाकूल वातावरणात सचिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गवडीचे सचिन पाटणे हे जानेवारी महिन्यात गावाला आले होते. ती कुटुंबाची आणि त्यांची शेवटची भेट ठरली आहे. त्यांचा मित्र परिवार ही मोठा होता. प्रत्येक ग्रामस्थ हळहळत हाेता (satara-marathi-news-sachin-patane-last-rituals-in-gavdi-ongc-tauktae-cyclone)

sachin patane
वयाच्या 67 व्या वर्षी स्वप्नपूर्ती! रहिमतपूरच्या पेंटरनं बनवली 'इलेक्‍ट्रिकल सायकल'

तौक्ते चक्रीवादळात ओएनजीसीचे कॉन्ट्रॅक्‍ट असलेल्या अफ्कॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीच्या बार्ज पी 305 हे जहाज मुंबईजवळ अरबी समुद्रात अडकून बुडाले. जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलाने बचावकार्य व अभियान राबवले. या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. त्यातील 187 जणांची नौदलाने सुखरूप सुटका केली, तर 37 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पाेचली. काही जण बेपत्ता असल्याचे सांगितले गेले. या बेपत्ता कर्मचा-यांत सचिन यांचा समावेश हाेता. नौदलाला 20 मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवणे मुश्‍किल झाले आहे. आता त्यांची डीएनए चाचणी करून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले हाेते.


चक्रीवादळात बार्ज बुडाल्याचे व त्या बार्जमध्येच सचिन असल्याचे कुटुंबीयांना कळाल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. सचिनचे वडील व दोन भाऊ यांनी मुंबई गाठली. घटनास्थळी जाऊन नौदल, पोलिस व कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली. जे. जे. हॉस्पिटलमध्ये तळ ठोकला. पण, सचिन मिळून आले नाहीत. "आमचं शोधकार्य चालू आहे,' एवढं ऐकण्यापलीकडे सचिन यांच्या नातेवाईकांच्या काहीच हाताला लागले नाही. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने खासदार उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लक्ष घालून सचिन यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जावळीकरांतून झाली. दरम्यान शनिवारी (ता.29) खासदार श्रीनिवास पाटील यांना पाटणे कुटुंबीयांना फोन करून सचिन यांचा शोध लावण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधून प्रयत्न करण्याची ग्वाही कुटुंबीयांना दिली हाेती.

Tauktae Storm
Tauktae StormSakal

अफ्कॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीत 2015 मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर सचिन हे रुजू झाले होते. गेल्या जानेवारीत ते गावाला आले होते. सचिन यांचा गावात मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या अशा बेपत्ता होण्याने पाटणे कुटुंबीयांसह गवडीकर व मित्र परिवार देवाकडे सचिन सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करीत हाेते. चक्रीवादळापूर्वी 15 तारखेला सचिन यांचे कुटुंबीयांशी फोनवर बोलणे झाले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शोधकार्यावर लक्ष

प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार राजेंद्र पोळ व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी गवडी येथे सचिन यांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांना धीर दिला हाेता. प्रशासन तुमच्या सोबत असून लवकरच सचिन यांचा शोध लागेल, असा विश्वास या अधिकाऱ्यांनीही दिला हाेता. आम्ही येलोगेट पोलिस ठाण्याशी सतत संपर्कात असून सचिन यांच्या शोध कार्याबाबत लक्ष ठेवून आहोत, असेही तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितले हाेते.

sachin patane
जन्माची नोंद करायची राहिली ? अखेरची संधी झालीय उपलब्ध

अखेर पाटणे यांचा मृतदेह गवडीत आला आणि सर्व गाव शाेकसागरात बुडाले. सचिन सुखरूप परत येईल यासाठी आम्ही सर्वांनी देवाकडे प्रार्थना केली हाेती. परंतु नियतीपुढे सर्व हतबल झाले. सचिन हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. गावातील मंडळात त्याचा सहभाग हिरीरीने असायचा. त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे ग्रामस्थ खंबीरपणे राहतील असा विश्वास राजू खुडे (उपसरपंच, गवडी) यांनी दिला.

sachin patane
माझा ढाण्या वाघ परत आला; अस्मानी संकटांशी झुंजलेल्या सुपुत्राला 'आई'चा कडक सॅल्युट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com