esakal | काेविडसह म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी 'सिव्हील' सज्ज; साता-यात स्वतंत्र कक्ष सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

mucor-mycosis

या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी शेखर सिंह सोमवारी होणाऱ्या बैठकीत घेणार आहेत.

काेविडसह म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी 'सिव्हील' सज्ज

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात म्युकरमायकोसिस mucormycosis या संसर्गाने तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तसेच सद्यःस्थितीत या प्रादुर्भावाचे जिल्ह्यात 28 रुग्ण असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. satara-marathi-news-three-died-mucormycosis-bed-facility-available-civil-hospital

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसताना म्युकरमायकोसिस या रोगाने डोके वर काढले आहे. या आजाराने जिल्ह्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, बाधितांमध्ये वाढ होत असल्याने परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र म्युकरमायकोसिसचा कक्ष सुरू करण्यात आले असून, रुग्णालयांच्या मुख्य इमारतीत तळ मजल्यावर सात बेडचे दोन कक्ष बायोप्सीच्या सुविधेसह सुरू करण्यात आले आहेत. या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी शेखर सिंह सोमवारी होणाऱ्या बैठकीत घेणार आहेत.

हेही वाचा: 21 वं शतक अन् 21 वा दिवस; वाचा आजचा दिवस कसा आहे प्रत्येकासाठी खास..

कोरोनाबाधित रुग्णांनाच विशेषतः उच्च मधुमेह असणाऱ्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची प्रामुख्याने लागण होत असल्याचा निष्कर्ष पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण बनले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 28 रुग्ण म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले असून, त्यामध्ये 9 रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील, तर 21 रुग्ण हे खासगी रुग्णालयात आहेत. मृत्यू झालेल्या तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयातील, तर 1 रुग्ण हा खासगी रुग्णालयातील आहे. कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये हा बुरशीजन्य आजार वाढत असल्याचे समोर आल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

खासगी रुग्णालयांना आदेश म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने नुकतीच जिल्ह्यातील खासगी डॉक्‍टर, सरकारी डॉक्‍टर नाक, कान, घसा तज्ज्ञ, डोळ्याचे तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, फिजिशियन यांची बैठक झाली. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती लपवली जाण्याचे प्रकार होत असल्याने खासगी रुग्णालयांनी तत्काळ रुग्णांची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहिती देणे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा: साताऱ्यात आठवडाभर कडक Lockdown; सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू

ब्लाॅग वाचा

satara-marathi-news-three-died-mucormycosis-bed-facility-available-civil-hospital

loading image