वाघावळेत डाॅक्टर नसल्याने नर्सच करताहेत रुग्णांवर उपचार

या ठिकाणी खास बाब म्हणून या दुर्गम भागातील रुग्णांसाठी वाघावळे येथे कोविड सेंटर उभारून औषधे, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर व सर्व इंजेक्‍शनचा पुरवठा करण्यात यावा, अशीही जनतेतून मागणी होत आहे. या निवेदनावर कोयना संघर्ष समितीचे अध्यक्ष एच. बी. जंगम आणि सचिव संदीप कदम यांच्या सह्या आहेत. हे निवेदन आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले आहे.
waghwale hospital
waghwale hospitalsystem

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर (mahableshwar) तालुक्‍यातील दुर्गम वाघावळे येथील आयुर्वेदिक दवाखाना व बेल एअर संस्थेच्या (belair management) आरोग्य केंद्रात डॉक्‍टर (doctor) नसल्याने येथील रुग्णांची परवड सुरू आहे. कोरोना संसर्गातच (coronavirus pandemic) या रुग्णालयाबरोबर या विभागातील रुग्णही व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कोयना धरणग्रस्त संघर्ष समिती मैदानात उतरली आहे. (satara-marathi-news-waghawale-doctor-nurse-belair)

कोयना धरणग्रस्त संघर्ष समितीने या समस्येबाबत निवेदन दिले आहे. कांदाटी या दुर्गम भागातील धरणग्रस्त 16 गावांच्या आरोग्यासाठी वाघावळे येथे बामणोली आयुर्वेदिक दवाखान्याचे उपकेंद्र असून बेल एअर आरोग्य केंद्र चालवत होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही विभागात डॉक्‍टर उपलब्ध नाहीत. कंपाउंडर व परिचारिकांचे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या कोविड महामारीने कांदाटी भागात शिरकाव केला असून विभागातील दोन रुग्ण दगावले आहेत. काही तळदेव येथे ऍडमिट आहेत. अनेक लोक आजारी आहेत. परंतु, त्यांना उपचारासाठी या दुर्गम भागात सोय नाही. तापोळे, महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाहतुकीची सोय नाही. खासगी वाहने बंद आहेत. या परिस्थितीचा विचार करून वाघावळे येथील दवाखान्यात त्वरित डॉक्‍टरांची नियुक्ती करावी. तसेच बेल एअरच्या आरोग्य केंद्रातही डॉक्‍टर उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

या ठिकाणी खास बाब म्हणून या दुर्गम भागातील रुग्णांसाठी वाघावळे येथे कोविड सेंटर उभारून औषधे, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर व सर्व इंजेक्‍शनचा पुरवठा करण्यात यावा, अशीही जनतेतून मागणी होत आहे. या निवेदनावर कोयना संघर्ष समितीचे अध्यक्ष एच. बी. जंगम आणि सचिव संदीप कदम यांच्या सह्या आहेत. हे निवेदन आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वरचे सभापती संजय गायकवाड व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले आहे.

waghwale hospital
तुम्ही कोणता मास्क वापरता? निवड करतांना 'ही' काळजी घेताय ना?
waghwale hospital
हॉस्पिटल उभारा अन्यथा कंपन्या सुरू करू देणार नाही : उदयनराजे
waghwale hospital
महाविकास आघाडीने मराठा बांधवांचे वाईट केले - नरेंद्र पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com