
सातारा : शहरासह जिल्ह्यात शनिवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने विविध ठिकाणच्या मशिदीमध्येही नमाज पठण करण्यात आले. सातारा शहरासह परिसरात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना गेल्या काही दिवसांपासून बकरी ईदचे वेध लागून राहिले होते. सणासाठीची खरेदी, तसेच कुर्बानीसाठीच्या बोकडांच्या खरेदीस मुस्लिम बांधवांकडून प्राधान्य देण्यात आले होते.