महाबळेश्‍वरात आमदार मकरंद पाटील भावुक; घराकडे परतणाऱ्यांना सांभाळून घ्या!

महाबळेश्‍वरात आमदार मकरंद पाटील भावुक; घराकडे परतणाऱ्यांना सांभाळून घ्या!
Updated on

महाबळेश्‍वर : क्वॉरंटाइन कालावधी संपल्यावर घरी परतणाऱ्या ग्रामस्थांना, तसेच कोरोनामुक्त झालेल्या लोकांना चांगली वागणूक द्या, त्यांना सांभाळून घ्या. त्यांना बहिष्कृत करू नका, तीही माणसे आपलीच आहेत, सध्या ते अडचणीत आहेत. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने महाबळेश्‍वर तालुक्‍यातील ज्या ज्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, अशा गावांना आमदार मकरंद पाटील यांनी भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणींसंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी अजित कदम उपस्थित होते.
 
महाबळेश्‍वर तालुक्‍यात मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार पाटील यांनी कोरोना रुग्ण आढळून आलेल्या काही गावांना भेटी दिल्या. प्रारंभी पाचगणी येथील सिद्धार्थनगरला भेट दिली. त्यानंतर बेलएअर रुग्णालयाची पाहणी केली. तेथून जवळच असलेल्या गोळेवाडी गावासही आमदार पाटील यांनी भेट दिली. निसर्ग वादळाने महाबळेश्‍वर येथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर कासरुंड, देवळी, कोट्रोशी, पारूट, हरचंदी, गोरोशी या गावांना भेट दिली. या गावात मुंबईकरांना क्‍वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यांचीही आमदार पाटील यांनी माहिती घेतली. क्वॉरंटाइन कक्षात असलेल्या सोयीसुविधांचा आढावा त्यांनी घेतला.
 
या वेळी पंचायत समितीच्या वतीने देवळी गावातील गरजूंना अन्नधान्याच्या किटचे वाटप आमदार पाटील, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या हस्ते झाले, तसेच आता पावसाळा सुरू होणार असून, प्रत्येक गावात प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीच्या सभापती अंजना कदम, उपसभापती संजयबाबा गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखास मारहाण करणाऱ्या ठेकेदारासह सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल


विधानपरिषदेसाठीची चक्र फिरवताहेत पृथ्वीराज चव्हाण? ज्येष्ठ नेते उंडाळकरांच्या मुलाच्या नावाची चर्चा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com