खासदार पोहोचले गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी

सचिन शिंदे
Friday, 31 July 2020

वर्षभर कष्ट करुन यश मिळवल्यानंतर आपले कौतुक व्हावे, हे प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला वाटणे स्वाभाविक आहे. हाच धागा पकडून खासदार श्रीनिवास पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन कौतुक केले. 

कऱ्हाड (जि. सातारा) ः दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन शाब्बासकी दिली. अनपेक्षितपणे मिळालेल्या शुभेच्छांनी विद्यार्थ्यांसह पालक भारावून गेले. पाटण तालुक्‍यातील बहुले, मारुल हवेली, नावडी व पाटण येथे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी भेट देऊन त्यांनी सत्कार केले. 

खासदार पाटील हे थेट घरी आल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह पालकही चकित झाले. अचानकपणे घडलेल्या प्रकाराने विद्यार्थ्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. पालकही अचंबित झाले. गारवडे येथील साक्षी पालेकरचे अभिनंदन केले. त्यानंतर बहुले, मारूल हवेली, नावडी व पाटण येथील विद्यार्थ्यांच्याही घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकत त्यांचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या त्यांच्या आई, वडिलांचा देखील खासदार पाटील यांनी सत्कार केला. खासदार पाटील यांनी शाळेतील आठवणही जागवल्या. 

या वेळी खासदार पाटील म्हणाले, ""दहावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी यशस्वीपणे तो पार पाडला. त्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे. त्यांना शाब्बासकी मिळाली, की ते आणखी चांगले यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील.'' 
 

(संपादन ः संजय साळुंखे)

 

येथे सापडला अर्धा किलोचा दुर्मिळ प्रजातीचा झिंगा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The MP reached the home of the meritorious students