esakal | धडक मोहीम! कऱ्हाड तालुक्‍यात 250 नळ कनेक्‍शन तोडली; 24 लाखांचा कर वसूल

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

धडक मोहीम! कऱ्हाड तालुक्‍यात 250 नळ कनेक्‍शन तोडली; 24 लाखांचा कर वसूल
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी पंचायत समितीकडून गावोगावी नळ कनेक्‍शन तोडण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत 25 गावांतील 250 नळकनेक्‍शन तोडण्यात आली आहेत. कारवाईसाठी गेल्यावर 24 लाख 25 हजार 526 लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे कडक लॉकडाउन करण्यात आली. त्यामुळे सर्वांचीची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे मागील वर्षी ग्रामपंचायतीच्या कर वसुलीला मोठा फटका बसला. परिणामी करवसुली प्रलंबित राहिली. टप्प्याटप्प्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने अनलॉकची स्थिती सुरू झाली. त्यानंतर थोडे अर्थचक्र फिरू लागल्याने ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली या गावात पिक्चरची शुटिंग

पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, पंचायत समिती सदस्य व गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत तालुक्‍यातील मसूर, पाल, गोंदी, नारायणवाडी, वडगाव हवेली, गोळेश्वर, सावरघर, संजयनगर-काले, तारुख, विंग, विरवडे, कोपर्डे हवेली, सैदापूर, तांबवे आदी गावांत वसुलीची मोहीम राबवण्यात आली. त्याअंतर्गत 250 नळ कनेक्‍शन तोडण्यात आली. कारवाईपोटी 24 लाख 25 हजार 526 रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. 

धक्कादायक! पेट्रोल विहिरीत गेल्याने जलचर मुत्युमुखी; सासवडात पेट्रोल पाइपलाइन फोडून चोरीचा प्रयत्न

कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कर वसूल झाल्याशिवाय ग्रामपंचायतीचा कारभार चालणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी कर भरून ग्रामपंचायतींना सहकार्य करावे. 

डॉ. आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी, कऱ्हाड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे