साताऱ्यात 654 ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के मतदान; गावकारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मशिन बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

सातारा जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरासरी 75 टक्के मतदान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.

साताऱ्यात 654 ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के मतदान; गावकारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मशिन बंद

सातारा : जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरासरी 75 टक्के मतदान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानासाठी गावोगावी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. गावाच्या कारभारासाठी मतदारांनी कोणाला कौल दिला, हे सोमवारी (ता. 18) मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. 

जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे गावपातळीवरील राजकारण तापले होते. अर्ज भरणे, छाननी, माघार या प्रक्रिया पार पडल्यानंतर गावपातळीवर प्रचाराने वेग घेतला होता. आरोप- प्रत्यारोपामुळे उडलेला प्रचाराचा धुराळा बसल्यानंतर आज सकाळी साडेसात वाजल्यापासून जिल्ह्यातील 654 गावांतील मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. हक्काचे मतदान करून घेण्यासाठी यानिमित्ताने गावागावांत चढाओढ लागली होती. मतदानासाठी दोन हजार 38 हजार केंद्रे, प्रक्रियेसाठी 19 हजार कर्मचारी, तर बंदोबस्तासाठी तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती.

माणमध्ये 47 पंचायतींसाठी चुरशीने मतदान; 724 उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद

आज सकाळी साडेनऊपर्यंत 13.11 टक्के मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यात वाढलेला मतदानाचा टक्का दुपारी दीड वाजता 54.10 च्या घरात पोचला. दुपारनंतर काही वेळ मतदानप्रक्रिया रेंगाळली. त्यानंतर पुन्हा मतदारांची गर्दी उसळली. आकडेवारीचा अंदाज घेत राहिलेल्या मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी गावपातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची चारनंतर धांदल उडाली होती. मतदानाची वेळ संपत आली असतानाच अनेक केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यात विविध ठिकाणी दिसून आले. दुपारी तीनपर्यंत 69.86 टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतरचा आकडा रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही. मात्र, जिल्ह्यात सरासरी 75 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सातारा तालुक्‍यातील 90, कऱ्हाड- 87, पाटण- 78, कोरेगाव- 49, वाई- 57, खंडाळा- 50, महाबळेश्‍वर- 14, फलटण- 74, जावळी- 37, माण- 47, खटाव- 77 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. झालेल्या मतांची मोजणी सोमवारी होणार असून, त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

मांढरदेव, सुरुर परिसरात जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नऊ हजार कारभारी ठरणार

जिल्ह्यात 654 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 813 वॉर्ड होते. या वॉर्डमधून नऊ हजार 51 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यात आला. पक्षीय पातळीपेक्षा स्थानिक गटातच लढती रंगल्या. त्यामुळे निवडणुकीत आणखी चुरस निर्माण झाली होती. या उमेदवारांसाठी मतदारांनी आज मतदान केले. या इच्छुक गावकारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी या सर्वांचा फैसला होईल. 

राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Web Title: Satara News 75 Percent Polling 654 Panchayats Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara