esakal | काय सांगता! पोटदुखीपासून वाचण्यासाठी 79 वर्षांचा आजोबा 31 वर्षांपासून खातोय चक्क मुरुमाचे खडे

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

रामदास बोडके यांचा जन्म १९ जुलै १९४२ रोजी आदर्की खुर्द येथील शेतकरी बोडके कुटुंबामध्ये झाला.

काय सांगता! पोटदुखीपासून वाचण्यासाठी 79 वर्षांचा आजोबा 31 वर्षांपासून खातोय चक्क मुरुमाचे खडे
sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : पोटदुखी पासून वाचण्यासाठी आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील ७९ वर्षीय रामदास बोडके यांनी चक्क मुरुमाचे खडे खाण्याचा रामबाण उपाय शोधला असून खडे खाण्याची ही मात्रा त्यांना लागूही पडली आहे. पोटदुखीचा आजार थांबला असला, तरी गेली ३१ वर्षे बोडके हे दररोज नियमितपणे पावशेर खडे खात आहेत, त्यामुळे बोडके हे या पंचक्रोशीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

रामदास बोडके यांचा जन्म १९ जुलै १९४२ रोजी आदर्की खुर्द येथील शेतकरी बोडके कुटुंबामध्ये झाला. घरची परिस्थिती बेताची व शेतीशिवाय पर्याय नव्हता. रामदास बोडके यांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले असून कुटुंब चालविण्यासाठी बोडके यांनी मुंबई गाठली. मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून काम करु लागले. मात्र, काम करीत असताना त्यांना १९७३ साली पोटदुखीचा त्रास सुरु झाला. अनेक उपाय इलाज दवाखाना करुनही रामदास बोडके यांचा पोटदुखीचा त्रास काही थांबत नसल्याने बोडके यांनी सन १९८८ साली राजीनामा देवून मुंबई सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला व ते गावी आले. गावी आल्यावर पोटदुखी व डिसेंट्रीचा त्रास सुरू झाला.

ऊसतोड मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टरला मिनीबसची जोरदार धडक; बीडसह कर्नाटकातील 18 जण जखमी

थोडेफार वाचनाची आवड असल्याने मी काही पुस्तके वाचत असताना युगात ६० हजार वर्ष विश्वामित्र यांनी तपश्चर्या सुरु असताना लोहाचे कण माती खडे खावून  तपश्चर्या केल्याचे माझे वाचनात आले असल्याची माहिती रामदास बोडके यांनी दिली. गावी आल्यानंतरही रामदास बोडके यांचा पोटदुखी त्रास थांबला नाही, त्यातच एक वयस्कर जाणकार यांनी सांगितले की काळ्या शेतातील माती कोळून पिल्यास डिसेंट्री बरी होईल, असे रामदास बोडके यांना सांगितले. सन १९९० पासून मला सांगितलेला उपाय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझा पोटदुखी आजार थांबला. मग मला हळूहळू मुरुमाचे खडे खाण्याची सवय लागली आणि आता सन २०२१ सालापर्यंत म्हणजे सुमारे ३१ वर्षे न चुकता मुरुम खडे दररोज खात आहे. मला दररोज पावशेर खडे खाण्यासाठी लागत असल्याचे रामदास बोडके यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राचा निधी द्या; खासदार उदयनराजेंची मंत्री गडकरींकडे मागणी

जेंव्हा मला पोटदुखीचा त्रास १९७३ साली सुरू झाला, तेंव्हा मी सर्व इलाज उपाय करून थकलो. मात्र, माझा त्रास काही कमी झाला नाही. मला यावर उपाय म्हणून पोटाचे आपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला व त्यासाठी ८० हजार रुपये खर्च येईल असे सांगण्यात आले. मात्र, मी आपरेशन न करता मला मिळालेल्या माहितीनुसार मुरुम खडे खाण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य मला ३१ वर्षे झाली आता कोणताही त्रास जाणवत नाही. मात्र, मुरुम खडे दररोज खावेच लागतात, असे बोडके यांनी शेवटी सांगितले.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे