फलटण तालुक्‍यात 81 टक्के चुरशीने मतदान; खासदार रणजितसिंह, संजीवराजेंनी बजावला हक्क

किरण बोळे
Friday, 15 January 2021

फलटण तालुक्‍यातील 74 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे 81.74 टक्के मतदान झाले आहे.

फलटण शहर (जि. सातारा) : तालुक्‍यातील 74 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे 81.74 टक्के मतदान झाले. तालुक्‍यात भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेली चुरस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत राजे गटापुढे बंडखोरांनी निर्माण केलेले आव्हान यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक चुरशीची झाली. 

तालुक्‍यातील 74 ग्रामपंचायतींसाठी 574 जागांसाठी एकूण 1255 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या निवडणुकीत तालुक्‍यातून सुमारे 81.74 टक्के मतदान झाले. 74 ग्रामपंचायतींमधील एक लाख 12 हजार 230 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये 58 हजार 828 पुरुष, तर 53 हजार 402 महिला मतदारांचा समावेश आहे.

माणमध्ये 47 पंचायतींसाठी चुरशीने मतदान; 724 उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद  

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व युवा नेते सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथे मतदानाचा हक्क बजाविला. पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी सोनगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता तालुक्‍यात सर्वत्र शांततेत व चुरशीने मतदान झाले.

राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News 81 Percent Polling For 74 Panchayats In Phaltan Taluka