esakal | मानलं! डॉ. प्रकाश आमटेंच्या 'लोक बिरादरी'साठी सहा हजार किलोमीटर सायकलिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सायकलप्रेमींचे हिरो डॉ. अमित समर्थ हे डॉ. प्रकाश आमटे यांच्या 'लोक बिरादरी' या प्रकल्पास आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी सायकलिंग करत आहेत.

मानलं! डॉ. प्रकाश आमटेंच्या 'लोक बिरादरी'साठी सहा हजार किलोमीटर सायकलिंग

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : या धावत्या आणि धगधगीच्या जगात अशक्य असं काहीच नाही. मात्र, ते शक्य करण्याची धमक मनात असावी लागते. एखाद्या चांगल्या कार्याला मदत करण्यासाठी आर्थिक सहकार्याबरोबरच आपल्या शारीरिक कष्टानेही आपण त्यांना मदत करु शकतो. हे एका ध्येयवेड्याने करुन दाखवलं आहे. 

महाराष्ट्रातील सायकलप्रेमींचे हिरो डॉ. अमित समर्थ हे डॉ. प्रकाश आमटे यांच्या 'लोक बिरादरी' या प्रकल्पास आर्थिक सहकार्य मिळावे व आदिवासी भागातील नवोदित खेळाडूंना उत्तम क्रीडा साहित्य मिळावे, यासाठी सायकलिंग करत आहेत. डॉ. अमित समर्थ हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचे सायकलिंग करणारे आहेत. द रेड बुल ट्रान्स सेबेरियन 9100 किमी व सुप्रसिध्द द रेस अक्रोस, अमेरिका 5000 किमी (आयएएएम) या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. लोक बिरादरीला सहकार्य मिळावे, म्हणून त्यांनी गेट वे ऑफ इंडिया ते बंगळूर, चेन्नई, कोलकता असा प्रवास सुरू केला आहे. यासाठी ते साधारण 30 किमी प्रति तास, असे सायकलिंग करत आहेत. 

हे पण वाचा- Success Story : कर हर मैदान फ़तेह! हिना इनामदारची भारतीय सैन्य दलात जिगरबाज भरारी

डॉ. समर्थ यांनी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 3 वाजता गेट वे आफ इंडिया येथून सायकलिंगला सुरुवात केली. दरम्यान, भारतातील विविध शहरातून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. नुकतेच त्यांचे साताऱ्यातही स्वागत करण्यात आले. यावेळी राजवी हलगेकर, संतोष शेडगे, तुषार भोईटे, हेमल उपाध्ये, प्रवीण शेळके यांनी स्वागत करुन सायकलिंगसाठी शुभेच्छा दिल्या.