
सौमय्या महाविद्यालयात एनसीसीतून हिनाने 2015 मध्ये जम्मू काश्मीरमधील माउंटेनिअरिंग कॅंप, तसेच 2016 ला स्कुबा डायव्हिंग कॅंप पूर्ण केला आहे.
भुईंज (जि. सातारा) : बेलमाची (ता. वाई) येथील हिना उस्मान इनामदार या युवतीने स्वतःच्या ताकद व जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्य दलात दाखल होण्याचा मान मिळवला आहे. आसाम रायफलमध्ये ती भरती झाली आहे.
बेलमाची येथील उस्मान इनामदार आणि आई हलिमा यांची हीना ही मुलगी. या दांपत्याला दोन मुले, एक मुलगी. बेलमाचीतील अनेक जण सैन्यात. त्यामुळे हिनाने ही सैन्यात दाखल होण्याची जिद्द बाळगली. सौमय्या महाविद्यालयात एनसीसीतून तिने 2015 मध्ये जम्मू काश्मीरमधील माउंटेनिअरिंग कॅंप, तसेच 2016 ला स्कुबा डायव्हिंग कॅंप पूर्ण केला. 2017 मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्ली होणाऱ्या राष्ट्रीय परेडसाठी तिची एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाली होती.
‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; आसाम रायफलमध्ये निवड
2018 मध्ये तिची पोलिस दलात निवड झाली होती. मात्र, तिने सैन्य भरतीसाठी प्रयत्न केले. 2018 मध्ये झालेल्या आर्मीच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेतून तिला यश मिळाले. भारतमातेच्या सेवेसाठी घरच्यांचा पाठिंबा होता. मला त्यांनी इथपर्यंत पोचण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. यापुढे मला पॅरा कंमाडोसाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया हिनाने भरती झाल्यानंतर दिली.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे