लाचखोर आयुक्‍त पोलिसांच्या जाळ्यात; कामगार नोंदणीसाठी मागितली तब्बल 11 लाखांची 'लाच'

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on

सातारा : शिरवळ येथील कंपनीतील कामगारांची नोंदणी करण्यासाठी दोन लाखांची लाच घेत असताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सहायक कामगार आयुक्‍त संजय शामराव महानवर (वय 42, हल्ली रा. धुमाळ निवासस्थान, सत्त्वशीलनगर, संभाजीनगर, सातारा, मूळ रा. माढा) याला अटक केली. अटकेतील महानवरने या कामासाठी एकूण 11 लाखांची मागणी केली होती. 

शिरवळ (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीत एक कंपनी असून, त्याठिकाणी एका खासगी कंपनीकडून कामगार पुरविण्यात येतात. या कामगारांची नोंदणी करण्यासाठीचा अर्ज लेबर सप्लायर कंपनीने सातारा येथील सहायक कामगार आयुक्‍तालयाकडे केला होता. अर्ज दाखल झाल्यानंतर सहायक कामगार आयुक्‍त संजय महानवर यांच्याशी लेबर सप्लायर कंपनीच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. या वेळी महानगर याने त्याच्याकडे कामगार नोंदणी करण्यासाठी 11 लाख रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देणे शक्‍य नसल्याने लेबर सप्लायर करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीने तडजोडीची विनंती महानवर यांच्याकडे केली. 

यानुसार तडजोडीअंती महानवर यांनी आठ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. याची तक्रार नंतर लेबर सप्लायर कंपनीने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. यानुसार तक्रारीची शहानिशा करून लाच घेताना महानवरला पकडण्यासाठीचा सापळा आज रचला. सापळ्यादरम्यान दोन लाखांची लाच घेताना महानवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या कारवाईत उपअधीक्षक अशोक शिर्के, निरीक्षक अविनाश जगताप, कर्मचारी शिंदे, ताटे, खरात, काटकर, भोसले कर्मचारी सहभागी झाले होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com