ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त साताऱ्यात तीन दिवस मद्यविक्री बंद

गिरीश चव्हाण
Sunday, 10 January 2021

ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील सर्व देशी दारूविक्री, विदेशी मद्यविक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी पूर्ण तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सातारा : ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील सर्व देशी दारूविक्री, विदेशी मद्यविक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्ण तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार मतदानाच्या आदल्यादिवशी 14 जानेवारी, मतदानादिनी (ता. 15) संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल. मतमोजणीच्या दिवशी (ता. 18) ग्रामपंचायतींच्या हद्दीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहतील, असे आदेशात जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले आहे. 

Facebook वरील मैत्री महागात; लग्नाच्या आमिषाने सातारच्या महिलेला लाखोंना गंडा; नाशिकातील एकावर गुन्हा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Ban On Sale Of Liquor For Three Days In Satara District