शिवाजी महाराजांच्या जिद्दीप्रमाणे कोरोना संकटावर मात करु : उद्धव ठाकरे

हेमंत पवार
Friday, 19 February 2021

महाराजांनी या मराठी माणसाला जिद्द व प्रेरणा दिली आहे. त्या जिद्दीच्या आणि प्रेरणेच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक संकटावर मात केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामे दर्जेदार करून पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. 

पाटण मतदारसंघातील ग्रामीण डोंगरी भागात मंजूर विविध विकासकामांचे ऑनलाइन ई-भूमिपूजन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी दौलतनगर येथून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ""155 कामांमध्ये रस्ते, मागासवर्गीय मुलांसाठी अभ्यासिका यासह विविध विकासकामे हाती घेतली आहेत. ही कामे दर्जेदार करावीत. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. 

हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

महाराजांनी या मराठी माणसाला जिद्द व प्रेरणा दिली आहे. त्या जिद्दीच्या आणि प्रेरणेच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक संकटावर मात केली आहे. आताही कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर आहे. या संकटासाठी आपला लढा यापुढेही सुरू राहील. या लढ्यामध्ये नागरिकांनी स्वत:ला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता याची शिस्त लावली पाहिजे. कोरोनाचे संकट असतानाही पाटण मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत.'' सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक निधी द्यावा, अशी मागणीही गृह राज्यमंत्री देसाई यांनी ऑनलाइन ई- भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Chief Minister Uddhav Thackeray Inaugurated The Development Works In Patan Taluka