
महाबळेश्वर व जावळी तालुक्यात सध्या रोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिके पूर्ण झोपली आहेत.
भिलार (जि. सातारा) : आधीच थंडीने गारठलेल्या महाबळेश्वर व जावळी तालुक्यात सध्या रोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिके पूर्ण झोपली आहेत. अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकरी हैराण झालेत. या सततच्या पावसामुळे थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घालावे की रेनकोट घालावा, अशा संभ्रमात सध्या नागरिक आहेत.
दोन्ही तालुक्यांत सध्या रब्बी हंगामाची ज्वारी, हरभरा, गहू ही पिके प्रामुख्याने घेतली आहेत. त्यामध्ये ज्वारी हे पीक सध्या या पावसाचे लक्ष्य झाले असून शेतातील ऐन भरात आलेली ज्वारी पावसाने पूर्णपणे शेतात कोलमडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्वारी भुईसपाट झालेली दिसते. ज्वारी आणि गव्हाची अवस्था सारखीच झाली. दाणे धरल्यामुळे दोन्ही पिके काळी पडून नुकसानीत अधिक वाढ झाली.
आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून
अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पोचणार नसल्याने दाणे भरणार नाहीत आणि कणसे काळवंडणारही आहेत. करडई, सुर्यफूल, इतर पिकांनाही मोठा फटका बसला. पिके अंतिम टप्प्यात असताना पावसाने घाला घातला. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. बेलोशी, दापवडी, रुईघर, महू परिसरात ज्वारी व गहू मोठ्या प्रमाणात घेतली जातो. दोन दिवसांच्या पावसाने बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी कोलमडली आहे. अगोदरच शेतकरी वन्यप्राण्यांमध्ये हतबल झाले असताना पीक वाचवत आहे. परंतु; त्यातच या अस्मानी संकटाने शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे.
वाह, क्या बात है! ट्रकमालकांच्या गावात पती-पत्नी बिनविरोध; ग्रामस्थांनी पाडला वेगळा पायंडा
संपादन : बाळकृष्ण मधाळे