esakal | 'टेस्ट लवकर केल्यामुळे दोनच दिवसांत कोरोना पळाला!'
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Samir Tamboli

'टेस्ट लवकर केल्यामुळे दोनच दिवसांत कोरोना पळाला!'

sakal_logo
By
फिराेज तांबाेळी

गाेंदवले (जि. सातारा) : गेले वर्षभर आपण कोरोना नावाच्या अदृश शत्रूशी झुंज देतोय. पहिली लाट ओसरत असतानाच दुसरी लाट कधी आली हे समजण्यापूर्वीच या लाटेने मलाही आपल्यात सामावून घेतलेही. मागील वर्षभरापासून मीही सर्व प्रकारची काळजी घेतली. कोरोनाच्या लाटेमध्ये असंख्य रुग्णांचा संपर्क आला; पण प्रतिकारशक्ती चांगली असल्याने व सर्व काळजी घेतल्याने त्या वेळी कोविड माझ्या वाट्याला आला नाही. त्यामुळे माझाही उत्साह दुणावला. कोविड रुग्णांशी संपर्क दररोजच येत राहिला. अशातच कोविडची लस आली. मी लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर कवच कुंडले मिळाल्याच्या थाटात वावरत असतानाच थोडासा त्रास झाल्याने टेस्ट केली अन्‌ ती पॉझिटिव्ह आली.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

तातडीने माझ्या संपर्कातील सगळ्यांची कोविड टेस्ट केली. स्वत:ला वरच्या मजल्यावरील खोलीत बंद करून घेतले आणि मग खऱ्या अर्थाने कोरोनाशी झुंज सुरू झाली. तत्काळ उपचार घेतलेच, शिवाय वाफारा आणि गरम पाणी अशा महत्त्वाच्या गोष्टींवरही अधिक भर दिला. 14 दिवस एकाच खोलीत बंद राहणे ही कसोटी होती. शारीरिक आजारांबरोबर मानसिकतेचाही कस लागणार होता. टेस्ट व उपचार लगेच सुरू केल्याने दोनच दिवसांत आजार पळून गेला. या काळामध्ये मानसिक खच्चीकरण होण्याचा धोका जास्त असतो. डॉक्‍टर पत्नी सर्वतोपरी काळजी घेत होती. मुले भांबावून गेली होती. हे सगळे नवीन होते. काही काळ मनाने खचलोही; पण लगेच उभारी घेतली. संग्रही पुस्तके वाचू लागलो. त्यातून प्रेरणा मिळू लागली. मानसिकता सकारात्मक होऊ लागली. मित्र फोन करून माझा धीर वाढवत होते.

पहिले दोन दिवस सोडले तर मला नंतर काहीही त्रास झाला नाही. कोरोना माझ्यासमोर सपशेल हरला होता. माझी जिद्द आणि सर्वांचे आशीर्वाद त्याला पुरून उरले होते. मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या कोरोना टाळण्यासाठी त्रिसूत्रीबरोबरच कोरोनाची लक्षणे आढळल्यावरही करायची नवीन त्रिसूत्री माझ्या लक्षात आली. कोविड लसीकरण, लक्षण आढळताच कोविड तपासणी आणि तत्काळ उपचार ही ती नवीन त्रिसूत्री. या त्रिसूत्रीच्या जोरावरच मी अवघ्या दोन दिवसांत कोरोनाला पळवून लावू शकलो. 14 दिवसांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर लगेच ड्युटीवर जायचे आहे. पुन्हा एकदा कोविड रुग्णांचा बरे करण्यासाठी झटून ही नवीन त्रिसूत्री राबवायची आहे.

एकीचे बळ! बोंबाळेत गावकऱ्यांनी उभारले विलगीकरण कक्ष

loading image
go to top