
सात पोकलेन मशिन व 66 स्फोटकांचे बॉक्स जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार टोपे यांनी आज दिली.
मल्हारपेठ (जि. सातारा) : नवारस्ता जवळील हरगुडेवाडी गावच्या हद्दीतील सात खडी क्रशरवर अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांना मिळाली. आज आणि काल सात क्रशरवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ते सील केले.
सात पोकलेन मशिन व 66 स्फोटकांचे बॉक्स जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार टोपे यांनी आज दिली. हारुगडेवाडीच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त ही कारवाई केली. घटनास्थळी तहसीलदार टोपे, पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात, पाटण पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, वैभव सोनावणे, सीताराम कदम, संजय दूधगावकर, तलाठी निवास देशमुख, अमोल पांचाळ, महेश घोरपडे उपस्थित होते.
महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली या गावात पिक्चरची शुटिंग
तहसीलदारांनी सांगितले, की हारुगडेवाडीच्या हद्दीत विनापरवाना अवैधरीत्या उत्खनन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी दोन क्रेशरवर छापा टाकून ते सील करण्यात आले. याशिवाय त्या ठिकाणचे सात पोकलेन सील करण्यात आले आहेत. संबंधित क्रेशरची परवानगी रॉयल्टी भरण्याबाबतच्या पावत्या यांची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, खाणीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकाची 66 बॉम्ब मिळून आले आहेत. त्याच्याही आवश्यक परवान्यांची तपासणी करण्यात येणार असून, याबाबत पोलिस प्रशासनाने ही स्फोटके ताब्यात घेतली आहेत. गुरुवारी पुन्हा पाच क्रेशरवर कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार टोपे यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे