ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन भोळीत एकावर फिल्मी स्टाईल गोळीबार; खंडाळ्यात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन भोळी गावात भरधाव वेगाने पिकअप गाडी फिरवून बंदुकीने एकावर फायरिंग केल्याची घटना घडली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन भोळीत एकावर फिल्मी स्टाईल गोळीबार; खंडाळ्यात खळबळ

शिरवळ (जि. सातारा) : काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन भोळी (ता. खंडाळा) गावात भरधाव वेगाने पिकअप गाडी फिरवून छरे असलेल्या बंदुकीने फायरिंग केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीड महिन्यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन सूरज मोहन भोसले (रा. तोंडल) याने सोबत काही युवकांना घेऊन भरधाव वेगात पिकअप (गाडीक्रमांक माहीत नाही.) चालवली. यावेळी पिकपच्या धडकेत रस्त्यावर बसलेली कुत्रीही मरण पावली. तसेच फिर्यादीच्या घरासमोर येऊन मारण्याची धमकी देऊन छरे असलेल्या बंदुकीने फायरिंग केले. तद्नंतर शिरवळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या घटनेबाबत निरंजन सोमनाथ चव्हाण रा. भोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार मदन वरखडे करीत आहे.

राजकीय गट-तट बाजूला ठेऊन खटाव-पुसेगावचा विकास साधणार : आमदार शशिकांत शिंदे

कोरेगावसह तालुक्‍यात कोरोनाचा कहर; सभापती जगदाळेंनी व्यक्त केली चिंता

एकदम झक्कास! आता वेळेत कर भरणाऱ्यांना मिळणार वॉटर एटीएम कार्ड मोफत

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top