esakal | भुतेघरच्या शेतकऱ्याची सोशल मीडियावर धूम; कन्नड, भोजपुरी, पंजाबी, मराठी, हिंदी भाषांतील हजार गाण्यांना तुफान लाईकस्

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

भुतेघर येथील शेतकरी सुनील मानकुंबरे यांना लहानपणापासून गायन व नृत्याची आवड होती.

satara
भुतेघरच्या शेतकऱ्याची सोशल मीडियावर धूम; कन्नड, भोजपुरी, पंजाबी, मराठी, हिंदी भाषांतील हजार गाण्यांना तुफान लाईकस्
sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील केळघर विभागातील भुतेघर येथील शेतकरी सुनील मानकुंबरे यांनी सादर केलेल्या गाण्यांना व नृत्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील या उदयोन्मुख कलाकाराच्या प्रतिभेचे कौतुक होत आहे. 

भुतेघर येथील श्री. मानकुंबरे यांना लहानपणापासून गायन व नृत्याची आवड होती. लॉकडाउन काळात त्यांनी ही आवड विशेष जोपासली. आतापर्यंत विविध भाषांतील एक हजारांहून अधिक गाण्यांवर चेहऱ्यावर हावभाव करून त्यांनी नृत्याद्वारे ही गाणी सादर केली आहेत. टिकटॉक, स्पॅन व्हिडिओ, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, मौज, जोश, फेसबुकवर अपलोड केलेल्या श्री. मानकुंबरे यांच्या व्हिडिओंना दर्शकांची पसंती मिळत आहे. 

हे पण वाचा- धक्कादायक! 2050 पर्यंत जगातील चारपैकी एका व्यक्तीची श्रवणशक्ती होणार कमजोर; WHO चा महत्वपूर्ण दावा

आतापर्यंत त्यांनी कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराथी, आसामी, मराठी, हिंदी भाषेतील सुमारे एक हजारांहून अधिक गाणी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड केली आहेत. ग्रामीण भागात विपुल गुणवत्ता असते, हे त्यांनी दाखवून दिले. सोशल मीडियावर या शेतकऱ्यांच्या गीतांना व नृत्यांना भरपूर लाईक मिळत आहेत. त्यांच्या या कलेचे कौतुक होत आहे. मला लहानपणापासूनच गायन व नृत्याची आवड होती. लॉकडाउनच्या काळात मी हा छंद जोपासला. सोशल मीडियावर माझ्या गीतांना चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढेही नवनवीन कल्पना राबवून गीते सादर करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुनील मानकुंबरे यांनी व्यक्त केली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे