esakal | उंब्रजच्या ग्रामीण भागात अवैध दारूधंदे जोमात; 'स्थानिक गुन्हे अन्वेषण'चे साफ दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

उंब्रजसह परिसरातील गावांत अवैध दारू चोरुन विकली जात आहे. त्यावर संबंधित विभागाचा जरब कमी झाल्याचे जाणवते आहे.

उंब्रजच्या ग्रामीण भागात अवैध दारूधंदे जोमात; 'स्थानिक गुन्हे अन्वेषण'चे साफ दुर्लक्ष

sakal_logo
By
संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : परिसरातील ग्रामीण भागामध्ये अवैध दारूधंदे सुरू असून, अवैध दारूधंद्यांवर पोलिसांची कारवाई दुर्मिळ झाली आहे. अवैध दारूधंदेवाले मोकाट झाले असल्याचे चित्र सद्य:स्थितीत दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, तर स्थानिक पोलिस प्रशासन वेळप्रसंगी चिरीमिरी कारवाईचा बडगा उगारत कारवाईचा "फार्स' करत आहेत. 

उंब्रजसह परिसरातील गावांत अवैध दारू चोरुन विकली जात आहे. त्यावर संबंधित विभागाचा जरब कमी झाल्याचे जाणवते आहे. पोलिसांनी केलेल्या किरकोळ कारवाईने परिसरातील गावांत अवैध दारूविक्री सुरू असल्याचे उघड होत आहे. तर संबंधित विभाग अवैध धंद्यांविरोधात कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर हे धंदे सुरू असून, देशी दारूच्या बाटल्या या उंब्रज परिसरातून दुचाकीसह चारचाकी वाहनांतून पोच केल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून चरेगाव येथील अवैध दारूचा गुत्ता बेफामपणे सुरू असून, याचा नाहक त्रास नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना होत आहे. 

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक होणारच 

काही दिवसांपूर्वी या गुत्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये दारूविक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही वर्षांपूर्वी चरेगाव (ता. कऱ्हाड) येथील एका बिअरबार विरोधात "उभी बाटली आडवी' करून दारूबंदी करण्यात आली होती. परंतु, त्याला न जुमानता त्याच बंद बिअरबारच्या आडोशाला गेली कित्येक वर्षे अवैध दारूविक्री सुरू आहे. याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पोच होते. परंतु, चरेगाव बीट अंमलदारास याबाबत काहीच माहिती नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आर्थिक हितसंबंधांमुळे या अवैध दारूविक्रीकडे डोळेझाक केल्याची चर्चा येथील नागरिकांतून सुरू आहे. 

सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर

आशीर्वाद कोणाचे? 

लॉकडाउनच्या काळात बंद असणारे अवैध दारूअड्डे अचानक तेजीत सुरू झाले असून, ते नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू झाले आहेत? याचा शोध घेण्याची आवश्‍यकता आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अशा अवैध दारूविक्रीवाल्यांवर वरदहस्त असून, वर्षातून केवळ एक ते दोन कारवाया करून पाठीवर कौतुकाची थाप मारून घेत असल्याची चर्चा नागरिकांतून बोलली जात आहे. पोलिस यंत्रणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून परिसरातील दारूधंद्यावर दिखाऊपणा करीत कारवाई केल्याचा आव आणत आहेत. तर आर्थिक तडजोड करीत याकडे पाठच फिरवली असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.  

मायबाप सरकार...पोटावर मारू नका! व्यापाऱ्यांची विनवणी; नियम पाळू व्यवसायाला परवानगी द्या 

गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image