esakal | बांधकाम मंडळात 12 लाख कामगारांची नोंद; मजदुरांना तत्काळ आर्थिक लाभ देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ कार्यरत आहे.

बांधकाम मंडळात 12 लाख कामगारांची नोंद; मजदुरांना तत्काळ आर्थिक लाभ देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ कार्यरत आहे. या मंडळाकडे 12 लाख कामगारांची नोंद असून, त्यांना देणे असणारे आर्थिक लाभ तत्काळ देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
या निवेदनात बांधकाम कामगारांचे 2016 पासूनचे लाभ प्रलंबित असून, लॉकडाउनच्या काळात भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी कामगारांना वस्तू नव्हे, तर आर्थिक मदत आवश्‍यक असल्याचे, तसेच वस्तू वाटपात होणारा गैरव्यवहार निदर्शनास आणून दिला. याबाबतचा ठराव करत तो केंद्राकडे पाठविण्यात आला. यानुसार वस्तू स्वरुपात लाभ देण्यास केंद्राने मनाई केली. 

रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावास राष्ट्रवादीतूनच विरोध; शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष 

यामुळे बांधकाम कामगारांना त्यांचे थकीत असणारे आर्थिक लाभ त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष शामराव गोळे, सुरेंद्र बोरकर, डी. जी. देशपांडे, विनोद केंजळे, विकास खाडे, जयवंत पवार, कृष्णात महामुनी आदी उपस्थित होते. या पत्रकाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयासही देण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर

मायबाप सरकार...पोटावर मारू नका! व्यापाऱ्यांची विनवणी; नियम पाळू व्यवसायाला परवानगी द्या 

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image